जय मल्हार नगर परिसरात जलवाहिनी टाकण्याच्या कामाला मिळाली गती नगरसेवक कुणाल पाटील यांच्या पाठ पुराव्याला यश
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील पिसवली येथील जय मल्हार नगर येथील सध्या 75 मिमी व्यासाची असलेल्या पाईपलाईनने पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नवीन लाईन 100 मिमी व्यासाची सुमारे 180 मीटर लांबीची नवीन लाईनचे काम करण्यासाठी नगरसेवक कुणाल पाटील, महापालिका अधिकारी व कर्मचारी अनंत मादगुंडी, मोरेश्वर राणे व उत्तम कदम यांनी पाहणी आज केली. लवकरच मंजुरी मिळवून सदर लाईन पूर्ण करण्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी कबूल केले. त्या नवीन लाईनमुळे वार्ड क्रमांक 86, 108 मधील अनेक नागरिकांची पाण्याची समस्या दूर होईल.तसेच देशमुख होम्स येथील नवीन लाईन जोडणीचे काम सुरु होते. तेथे देखील पाहणी केली.परंतु आताच्या नवीन लाईनने मिळणारे पाणी देशमुख होम्स मधील 1200 फ्लॅट धारकांना पुरेसे होणार नसल्याची भावना तेथील नागरिकांनी व्यक्त केली. नागरिकांची मागणी लक्षात घेता देशमुख होम्स या संकुलकरिता अजून एका मोठ्या व्यासाच्या पाईप लाईनसाठी मागणी नगरसेवक कुणाल पाटील यांनी केली. तसेच यापूर्वी देखील कुणाल पाटील फाउंडेशन संस्थेतर्फे देशमुख होम्ससाठी स्ट्रीट लाईट स्वखर्चाने बसवण्यात आले होते. घरगुती गॅसच्या पाईपलाईनसाठी देखील पुढाकार घेऊन सहकार्य केले होते.लवकरच आयुक्तांची भेट घेऊन देशमुख होम्सकरिता नवीन लाईनचे काम सुद्धा पूर्ण करून घेणार असल्याचे आश्वासन नगरसेवक कुणाल पाटील यांनी नागरिकांना दिले. दरम्यान कल्याण पूर्व भागातील आडीवली ढोकली परिसरातील रस्त्यावर खड्डे झाल्याने नगरसेवक कुणाल पाटील यांनी काही दिवसापूर्वी खड्डय़ामधील चिखल आणि पाण्यात बसून ठिय्या आंदोलन केले होते. त्यांच्या आंदोलनाची केडीएमसी प्रशासनाने दखल घेत आडीवली ढोकली परिसरातील रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

Post a Comment

0 Comments