शिळ - डायघर, मुंब्र्यात येऊ लागले गुंतवणू कदार मारुती सुझुकीच्या रुपात पहिले वाहन शोरुम सुरुठाणे (प्रतिनिधी) - मुंब्रा-कौसा भाग हा काही वर्षांपूर्वी मोठमोठ्या कंपन्यांनी जणूकाही काळ्या यादीमध्ये टाकला होता. मात्र, या भागात होत असलेल्या विकासामुळे गुंतवणूकदारांची पावले मुंब्रा-कौसा, शिळफाट भागाकडे वळू लागली असून या भागात मारुती-सुझुकी कंपनीने आपले शो-रुम सुरु केले आहे.          मारुती-सुझुकीच्या वेलॉक्स या शोरुमच्या रुपाने सदर भागातील पहिले वाहन विक्रीचे केंद्र सुरु झाले आहे. मुंब्रा-कौसा भागात या आधी चारचाकी गाड्या विक्रीचे एकही केंद्र नव्हते. अनेक वित्तसंस्थांनी या भागात वित्तपुरवठा करण्यासही असमर्थता दर्शविली होती. या भागातील नागरिकांना वाहनकर्ज मिळविण्यासाठीही मोठे दिव्य करावे लागत होते.             परिणामी, या भागात चारचाकी वाहने उत्पादन करणार्‍या कंपन्या आपले विक्रीकेंद्र सुरु करण्यास तयार नव्हत्या. परिणामी, येथील नागरिकांना चारचाकी वाहन घेण्यासाठी ठाणे, कल्याण, मुंबई गाठावी लागत होती. आता ही अडचण दूर झाली आहे. मुंब्रा-कौसा-शिळ या भागाचा वेगवान विकास गेल्या 10 ते 12 वर्षात होऊ लागला आहे.            मुंब्रा भागातील रस्त्यांचे बांधकाम, नवीन वसाहतींची निर्मिती यामुळे गुंतवणूकदारांचे मुंब्रा भागाकडे लक्ष वळू लागले असून वोलेक्स या कंपनीने मुंब्रा येथे गुंतवणूक करुन त्याची सुरुवात केली आहे. येथील भूमी लॉन्स,   कल्याण- शिळफाटा रोड, दत्त मंदिराजवळ , शिळफाटा येथे वोलेक्स  नावाचे मारुती-सुझुकी कारचे शो रूम  सुरु करण्यात आले आहे.             या ठिकाणी मारुती-सुझुकी कंपनीने तयार केलेली सर्व वाहनांची विक्री करण्यात येणार असून कार खरेदीदारांच्या वित्तीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी वित्तीय संस्थांनाही तैनात करण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंब्रा, शिळ, डायघर येथील वाहन खरेदीदारांना वाहन कर्जदेखील तत्काळ मिळणार आहे, असे वेलॉक्सचे महाव्यवस्थापक सचिन गावडे  यांनी सांगितले.          सोमवारी दुपारी या शो रुमचे अनावरण करण्यात आले. यावेळी मारूती- सुझुकीचे पश्चिम विभाग व्यवसाय प्रमुख  अनुप सिन्हा, विभागीय व्यवस्थापक भरत संपत,  दिग्विजय गर्जे, आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments