कामगारांचे लसीकरण करून कोरोना प्रतिबंधक उपाय कंपनीत सुरू ठेवण्यावर उद्योजक आघाडीवर


 डोंबिवली ( शंकर जाधव ) संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी सर्व कोरोना प्रतिबंधक उपाय कंपनीत सुरू ठेवण्यासाठी उद्योजक भर देत असल्याची  माहिती  कामा संघटनेच्या वतीने  देण्यात आली आहे. यामुळे उद्योग धंद्याला चालना देता येईल. काही छोट्या उद्योजकांना ३-४ कामगारांची निवास व्यवस्था करणे शक्य असले तरी सर्वांना ते शक्य नाही.
      त्यामुळे फक्त कामगारांचे लसीकरण करून सर्व कोरोना प्रतिबंधक उपाय कंपनीत सुरू ठेवण्यावर उद्योजक आघाडीवर आहेत. लॉकडाऊन काळात कामगारांच्या सर्व समस्या सोडवून त्यांची पूर्ण काळजी उद्योजकांनी घेतली होती अशी माहिती कामाकडून मिळत आहे.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले प्रमाणे कामगारांचे लसीकरण पुर्ण करण्याकडे भर देण्यात येईल यामुळे लोकल मध्ये प्रवास करण्यास मुभा मिळेल.
   राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असून राज्यशासन सर्व व्यवहार सुरू करण्यासाठी कार्यरत आहे. ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले असतील त्यांना रेल्वेप्रवासाला मुभा देण्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली आहे.  ज्यांच्याकडे याबाबचे प्रमाणपत्र असेल अशा रेल्वे प्रवाश्याना १५  ऑगस्टपासून रेल्वे प्रवास करण्यासाठी मुभा मिळणार आहे. 
       परंतु  कोरोनाच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेचीही  भिती व्यक्त होत आहे. यादृष्टीने उद्योजकांना याविषयी जागरूक राहून काळजीची देखील जबाबदारी येत आहे. याबाबत कामाचे माजी अध्यक्ष डॉ.देवेन सोनी सांगतातकामा अंतर्गत   सुमारे ४०० उद्योग  असून,  १.५ लाख कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.यातील ५० टक्के कामगार स्थानिक असून ठाणे,कसाराकर्जतटिटवाळाअंबरनाथबदलापूरकल्याण येथून येत असतात.
        जर तिसरी कोरोना लाट आली तर स्थानिक ५० टक्के कामगारांच्या साहाय्याने उद्योग सुरू राहतील. काही छोट्या उद्योजकांना ३-४ कामगारांची निवास व्यवस्था करणे शक्य असले तरी सर्वांना ते शक्य नाही.त्यामुळे फक्त कामगारांचे लसीकरण करून सर्व कोरोना प्रतिबंधक उपाय कंपनीत सुरू ठेवण्यावर उद्योजक आघाडीवर आहेत. लॉकडाऊन काळात कामगारांच्या सर्व समस्या सोडवून त्यांची पूर्ण काळजी उद्योजकांनी घेतली होती अशी माहिती कामाकडून मिळत आहे.
           यावेळी कामा संघटनेचे विद्यमान अध्यक्ष नारायण टेकाडेमाजी अध्यक्ष देवेन सोनी तसेच संचालक राजू बैलूरमुरली अय्यरकमल कपूरउदय वालावलकर आदी उपस्थित होते. दरम्यान कामाचे नवनिर्वाचित अध्यक्ष नारायण टेकाडे म्हणालेराज्य सरकारचे नवीन उद्योग आणण्याचे जरी धोरण चांगले असले तरी सद्यस्थितीत आहेत त्या उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. औद्योगिक क्षेत्रात कामगार हा घटक केंद्रस्थानी आहे त्याचा संपर्क अनेकांशी येत असल्याने त्याची आणि त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याची सुरक्षितता महत्वाची आहे असे मतही टेकाडे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments