रेड बुल नेमार ज्‍युनिअर्स टूर्नामेण्‍ट पाचव्‍या पर्वासाठी परतली आहे!


■या टूर्नामेण्‍टमध्‍ये तुमच्‍या शहराचे प्रतिनिधित्‍व करा आणि मिळवा नेमार ज्‍युनिअरसोबत खेळण्‍याची संधी..


भारत, २६ऑगस्‍ट २०२१ :   रेड बुल नेमार ज्‍युनिअर्स फाइव्‍ह टूर्नामेण्‍ट देशभरातील क्‍वॉलिफायर्ससह भारतातील पाचव्‍या पर्वासाठी परतली आहे. चॅम्पियनशीपच्‍या २०२१ एडिशनमध्‍ये भारतभरातील १८ शहरांमध्‍ये क्‍वॉलिफायर्सचे आयोजन केले जाणार आहे. हे क्‍वॉलिफायर्स ऑगस्‍ट व सप्‍टेंबर महिन्‍यांमध्‍ये आयोजित करण्‍यात येणार असून नॅशनल फायनल सप्‍टेंबरच्‍या शेवटच्‍या आठवड्यामध्‍ये आयोजित करण्‍यात येईल.         सिटी क्‍वॉलिफायर्सचे विजेते नॅशनल फायनलमध्‍ये एकमेकांशी स्‍पर्धा करतील, जेथे अंतिम विजेत्‍याला रेड बुल नेमार ज्‍युनिअर्स फाइव्‍ह इंडिया चॅम्पियन्‍स म्‍हणून घोषित करण्‍यात येईल. तसेच त्‍यांना कतारमधील वर्ल्‍ड फायनल्‍समध्‍ये स्‍पर्धा करण्‍याची संधी मिळेल, जेथे ते सुपरस्‍टार फूटबॉलपट्टू नेमार ज्‍युनिअरला भेटतील.
         रेड बुल नेमार ज्‍युनिअर्स फाइव्‍ह ही ब्राझीलियन स्‍टार खेळाडूची सिग्‍नेचर फाइव्‍ह-ए-साइड टूर्नामेण्‍ट आहे. ही टूर्नामेण्‍ट जगाच्‍या कानाकोप-यातील १६ ते ३५ वर्षे वयोगटातील खेळाडूंना फूटबॉलप्रती त्‍यांची आवड दाखवण्‍यासाठी एकत्र आणते. ही जलद, टेक्निकल व मजेशीर स्‍पर्धा आहे. दोन्‍ही संघांमध्‍ये पाच खेळाडू, शिवाय एक गोलकीपर असतो.         खेळाडूंना १० मिनिटांच्‍या खेळामध्‍ये त्‍यांचे कौशल्‍य दाखवत नेमार ज्‍युनिअरला प्रभावित करावे लागते. या थरारामधील रोमांचक बाब म्‍हणजे संघाने केलेल्‍या प्रत्‍येक गोलासाठी प्रतिस्‍पर्धी संघातील एका खेळाडूला मैदानाच्‍या बाहेर जावे लागते. मैदानात सर्वाधिक खेळाडू असलेला संघ विजेता ठरतो.
       या जागतिक फूटबॉल टूर्नामेण्‍टच्‍या उत्‍क्रांतीबाबत बोलताना नेमार ज्‍युनिअर म्‍हणाले, ''हे खूपच अद्भुत असते. असे वाटते की, आजच सुरूवात झाली आहे. त्‍यांनी मला स्‍पर्धेसाठी प्रस्‍ताव, नियम, मला माझ्या बालपणीच्‍या दिवसांची आठवण करून देणारे संग्रहित केलेले गोल्‍स दाखवले. फूटबॉल खेळाडू ५-ए-साइड गेम्‍सचा विचार करतील तेव्‍हा त्‍यांच्‍यासाठी रेड बुल नेमार ज्‍युनिअर्स फाइव्‍हमध्‍ये बदल घडवून आणण्‍याचा उद्देश होता आणि मला वाटते की, आम्‍ही योग्‍य दिशेने वाटचाल करत आहोत.         मागील चार वर्षांमध्‍ये क्‍वॉलिफायर्समध्‍ये डझनभर देशांमधील ४००,००० हून अधिक लोकांनी सहभाग घेतला आहे. अधिकाधिक महिला संघांसोबत उच्‍च पातळीवरील महिला या टूर्नामेण्‍टमध्‍ये सहभाग घेत असल्‍याचे खूपच चांगले वाटत आहे. ही आमच्‍या प्रवासाची फक्‍त सुरूवात आहे.''  
        रेड बुल नेमार ज्‍युनिअर्स फाइव्‍ह २०१९ भारतीय चॅम्पियन्‍स मुंबईतील कलिना रेंजर्सने ब्राझीलमधील वर्ल्‍ड फायनल्‍समध्‍ये भारताचे प्रतिनिधित्‍व केले आणि हंगेरीविरूद्ध ऐतिहासिक विजयासह बहुमूल्‍य अनुभव मिळवला. हंगेरी संघ या टूर्नामेण्‍टचा विजेता ठरला.


रेड बुल नेमार ज्‍युनिअर्स फाइव्‍ह इंडिया क्‍वॉलिफायर वेळापत्रक:


इंदौर: फ्यूत्‍सल वनद्वारे जोगाबोनिटो येथे २१ व २२ ऑगस्‍ट रोजी


अहमदाबाद: जगरनॉट एरिना येथे २१ व २२ ऑगस्‍ट रोजी


जयपूर: स्‍पोर्टस् विला, निर्माण नगर येथे २१ व २२ ऑगस्‍ट रोजी


बेंगळुरू: टर्फ पार्क कोरमंगला येथे २१ व २२ ऑगस्‍ट रोजी


लखनौ: पोलो ग्राऊण्‍ड, ली मार्टिनीअर कॉलेज येथे २७ ऑगस्‍ट रोजी


पुणे: हॉट फुटकोरेगाव पार्क येथे २८ व २९ ऑगस्‍ट रोजी  


कोलकाता: एफडी ब्‍लॉक पार्क, सॉल्‍ट लेक येथे २८ व २९ ऑगस्‍ट रोजी


चेन्‍नई: टिकी टाका, टी नगर येथे २८ व २९ ऑगस्‍ट रोजी


सिलगुडी: लेव्‍हल अप टर्फ, ज्‍योती नगर येथे ४ सप्‍टेंबर रोजी


मुंबई: नेविल डी'सूझा टर्फ (बांद्रा रिक्‍लेमेशन) येथे ४ व ५ सप्‍टेंबर रोजी


दिल्‍ली: किक्‍सल (छत्तरपूर) येथे ४ व ५ सप्‍टेंबर रोजी


हैदराबाद: अॅस्‍ट्रो पार्क येथे ४ व ५ सप्‍टेंबर रोजी


जालंधर: खालसा कॉलेज, मोहयाल नगर येथे ४ व ५ सप्‍टेंबर रोजी


दिमापूर: सिटी फुत्‍सल, ऑर्चिड ग्राऊण्‍ड्स येथे ११ सप्‍टेंबर रोजी


भुवनेश्‍वर: केआयआयटी युनिव्‍हर्सिटी येथे ११ व १२ सप्‍टेंबर रोजी


कोची: ईएसपीआयआरआयटीओ येथे ११ व १२ सप्‍टेंबर रोजी


चंदिगड: लेगसी मॅटर्स व हाय स्‍कोअर येथे ११ व १२ सप्‍टेंबर रोजी


गोवा: प्‍ले गोव, कॅकुलो मॉल येथे ११ व १२ सप्‍टेंबर रोजीज्‍युनिअर्स ग्‍लोबल फाइव्‍ह कन्‍झ्युमर अॅक्टिवेशनमध्‍ये खेळाडू सर्जनशील पद्धतीने त्‍यांची कौशल्‍ये दाखवू शकतात, त्‍यांचे रेकॉर्डिंग करून (बेस्‍ट प्‍ले – अधिकतम ६० सेकंद) त्‍यांना इन्‍स्‍टाग्रामवर (हॅशटॅग #outplaythemall चा वापर करा, @redbullneymarjr’sfive ला टॅग करा आणि तुमच्‍या राष्‍ट्रध्‍वजाची भर करा) पोस्‍ट करू शकतात आणि नेमार ज्‍युनिअर व त्‍याच्‍या स्‍काऊट्सचे लक्ष वेधून घेऊ शकतात. ते यंदाच्‍या वर्ल्‍ड फायनलमध्‍ये ज्‍युनिअर्स ग्‍लोबल फाइव्‍ह म्‍हणून सहभाग घेण्‍यासाठी ६ खेळाडू व १ वाइल्‍ड कार्ड एंट्रीची निवड करतील.


नोंदणीसाठी भेट द्या: https://www.redbull.com/in-en/events/red-bull-neymar-jrs-five-india-2021

Post a Comment

0 Comments