दोन तोळे सोनं चोरणाऱ्या दोघा महिलांना २४ तासांत अटक टिटवाळा पोलिसांची कामगिरी

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  एका महिलेच्या पिशवीतील दोन तोळे सोनं चोरणाऱ्या दोघा महिलांना २४ तासांत अटक करण्यात टिटवाळा पोलिसांना यश आले आहे.कल्याण तालुका पोलीस स्टेशन हद्दीत टिटवाळा बाजारपेठेत सोमवारी पार्वतीबाई बोराडे वय ५० वर्षे रा. टिटवाळा या महिला बाजारपेठेत खरेदी करण्याकरिता गेल्या असता त्यांच्या हातातील पिशवीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पिशवी कापून पिशवीत ठेवलेले ५२ हजार रुपये किमतीचे सुमारे २ तोळे वजनाचा सोन्याचा ऐवज लंपास केला. ही बाब महिलेच्या लक्षात आल्यानंतर महिलेच्या फिर्यादीवरून टिटवाळा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता.       या गुन्ह्यातील आरोपींचा कल्याण तालुका पोलिस स्टेशन  पोलिस उप निरीक्षक सुर्वेपोलिस उप निरीक्षक काजोल यादव, पोलिस कर्मचारी तुषार पाटीलदर्शन सावळेनितीन विशे, योगेश वाघेरे यांनी शिताफीने शोध घेवून  सोन्याचा ऐवज लुटणाऱ्या  गुन्ह्यातील दोन महिला  आरोपी ज्योती अनिल धोत्रे वय २७  वर्ष राहणार आंबिवली आणि पिंकी मनोज साळुंके वय ३५ वर्ष राहणार आंबिवली यांना २४ तासांच्या आत ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असता आरोपी महिला यांना अटक करून पुढील कार्यवाही करत आहेत.

Post a Comment

0 Comments