कळवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

 

■अनधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे...


ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज कळवा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.        या कारवाईतंर्गत कळवा प्रभाग समितीमधील लक्ष्मि अपर्टमेंट जवळ आझाद चौक खारेगाव येथे  अमृत पार्क तळ + ९  मजली अनधिकृत इमारतीच्या रुमच्या भिंती व दरवाजे निष्कासित करण्यात आल्या. कळवा मच्ची मार्केट जवळ राज वाईन्स च्या पाठीमागे  ओम मयुरेश सोसायटी तळ + ८  मजली अनधिकृत इमारतीच्या ११ रुमच्या अंतर्गत भिंती निष्कासित करण्यात आल्या. कळवा मार्केट  ते स्टेशन रोड  येथील रस्त्यावरचे फेरीवाले वर कारवाई करण्यात आली         सदर निष्कासनाची कारवाई कळवा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त  प्रणाली घोंगे आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या सहाय्याने करण्यात आली.Post a Comment

0 Comments