एंजेल ब्रोकिंगने यशाची २५ वर्षे पूर्ण केली

 
मुंबई, २५ ऑगस्ट २०२१ : फिनटेक प्लॅटफॉर्म एंजेल ब्रोकिंग लिमिटेडने या महिन्यात एंजेल वन या वन-स्टॉप फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रँडचे रिब्रँडिंग करून यशाची २५ वर्षे साजरी केली. १९९६ मध्ये पारंपारिक स्टॉकब्रोकिंग कंपनी म्हणून स्थापन झालेल्या एंजेल ब्रोकिंगने गेल्या काही वर्षांत अभूतपूर्व वृद्धीचा चढता आलेख तयार केला, त्यात डिजिटल बदलांची नांदी झाली आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रशंसेसह अनेक पुरस्कार मिळाले. आपल्या स्टॉकब्रोकिंग उद्योगाचे डिजिटायझेशन आणि पारंपारिक ब्रोकरची फिनटेक प्लॅटफॉर्मवर उत्क्रांती तसेच आयपीओ सेवेसह अडीच दशकांचा हा यशस्वी प्रवास मैलाचा दगड ठरला आहे.         आपल्या डीएनएतील तंत्रज्ञान कौशल्यामुळे, एंजेल ब्रोकिंग आपल्या ग्राहकांना त्वरित खात्री देण्यासाठी ट्रेडिंग फ्लोअरवर वॉकी-टॉकी वापरणे, २००१ मध्ये वेब-सक्षम बॅक ऑफिस स्थापन करण्यासाठी भारतातील सर्वात जून्या स्टॉकब्रोकिंग कंपन्यांपैकी एक असणे, २००२ मध्ये इंटरनेट ट्रेडिंग आणि कमोडिटी ब्रोकिंग सेवा सुरू करणे आणि २००६ मध्ये आपली पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा सुरू करणे यांसारख्या अनेक संकल्पना पहिल्यांदा प्रत्यक्षात राबविल्या.       प्रथम गुंतवणूकदारांना, विशेषत:  मिलेनियल्सला समोर ठेवत, कंपनीने तंत्रज्ञानावर आधारित सेवांचा विस्तार केला आणि प्रत्येक भारतीयासाठी, विशेषत: टियर २, टियर ३ आणि शहरांपलीकडे असलेल्या वित्तीय सेवांचे लोकशाहीकरण केले. आयट्रेड प्राइम अंतर्गत नाममात्र शुल्क आकारत, ब्रोकरेज सेवांसह, एंजल ब्रोकिंगने भांडवल बाजारात प्रवेश न केलेल्या लाखो लोकांसाठी संपत्ती निर्मितीची दारे उघडली.       स्मार्ट स्टोअर, स्मार्ट मनी, यूपीआय ऑटोपे फॉर म्युच्युअल फंड्स आणि चॅटबॉट्स यांसारख्या अनेक अत्याधुनिक सेवा सुविधा पुरवत कंपनीने गुंतवणुकीचे लँडस्केप बदलविले.  ओपन-आर्किटेक्चर-आधारित प्लॅटफॉर्म, स्मार्ट एपीआयने या सेवांआधारे कंपनीने ग्राहक अनुकूल सुविधांची वचनबध्दता जपली.      आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून, फिनटेक प्लॅटफॉर्म, त्याच्या मोबाइल ट्रेडिंग अॅपसह, व्यापार, संबंधित बाजाराची अद्ययावत माहिती, सल्लागार सेवा आणि परदेशी समभागांमध्ये गुंतवणूकीची अखंड सेवा पुरविली.

Post a Comment

0 Comments