महा. अंनिसची ठाणे जिल्हा कार्यकारणी जाहीर

 


■अध्यक्ष सुलभा कांबळे, उपाध्यक्षपदी गौतम जाधव तर जिल्हा कार्याध्यक्षपदी राजेश देवरुखकर आणि जिल्हा प्रधान सचिवपदी निशिकांत विचारे यांनी स्वीकारला पदभार...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्ह्यासाठीची २०२१-२३साठी  नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात असून जिल्हाध्यक्ष म्हणून सुलभा कांबळे आणि उपाध्यक्षपदी गौतम जाधव यांची एकमुखाने निवड करण्यात आली. तसेच जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून राजेश देवरुखकर आणि जिल्हा प्रधान सचिव म्हणून निशिकांत विचारे यांनी यावेळी पदभार स्वीकारला.संघटनेच्या कार्यप्रणालीतील इतर महत्त्वाची पदे देखील यावेळी निवडण्यात आली असून विविध उपक्रम विभाग कार्यवाह म्हणून परेश काठेवैज्ञानिक जाणिवा विभाग कार्यवाह पदासाठी विनोद म्हात्रेमहिला विभाग कार्यवाह कल्पना बोंबेमानसिक आरोग्य विभाग व्यवस्थापन कार्यवाह सावित्री जोगदंड तसेचअंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका विभाग कार्यवाह मुकुंद देसाई आणि युवा सहभाग विभाग कार्यवाह रोहित चंदनशिवे यांची निवड करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी एक दिलाने काम करण्याचा आणि संघटनेचे कार्य जोमाने पुढे नेण्याचा निर्धार या प्रसंगी व्यक्त केला. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य सुशीला मुंडे, सुरेखा भापकर, नितीन राऊत, उत्तम जोगदंड, नंदकिशोर तळाशीलकर उपस्थित होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी  जिल्हा कार्याध्यक्ष राजेश देवरुखकर  ९१६७५६८१८७, जिल्हा प्रधान सचिव निशिकांत विचारे ९७०२०५८०९० यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments