कल्याणात खान्देश संघटनांचे ईडीच्या विरोधात आंदोलन

 

■एकनाथ खडसे यांच्यावरील ईडीची कारवाई थांबविण्याची केली मागणी...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : भोसरी जमीन खरेदी प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर ईडीतर्फे  राजकीय दबावातून वारंवार चौकशी करत कारवाई केली जात असल्याचा आरोप करत ईडी विरोधात आज कल्याण डोंबिवली परिसरातील सर्व खान्देशी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन कल्याण तहसीलदार कार्यालया बाहेर नारेबाजी करत ईडीने कारवाई थांबवा अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा देत कल्याण तलसीदारांना निवेदन दिले.यावेळी खांन्देश परिवार कल्याण डोंबिवली माध्यमातुन खांन्देश हित संग्रामचे शहर अध्यक्ष प्रशांत माळी यांच्या आयोजनार्थ व खांन्देश हित संग्रामचे अध्यक्ष भैय्या पाटील, खान्देश मराठा मंडळाचे अध्यक्ष रवि पाटील, तसेच खांन्देश एल्गारचे अध्यक्ष विजय चव्हाण, उत्तर महाराष्ट खांन्देश मंडळाचे संपर्क प्रमुख प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शना खाली आज खान्देश परिवार कल्याण डोंबिवली च्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी खान्देश हित संग्राम पदधिकारी,नाना पाटील,कैलास पाटील,योगेश माळी, खांन्देश मराठा पाटील मंडळाचे पदधिकारी रविद्रं पाटील व विजय पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.राजकीय आकसापोटी इडी सारख्या स्वायत्त संस्थेचा दुरुपयोग करून केंद्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना बदनाम करणेत्यांच्यावर खोटे गुन्हे नोंदवून त्यांना नाहक चौकशी साठी ताटकळत ठेवणे असाच निंदनीय प्रकार माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे व त्यांच्या कुटुंबीयासोबत होत असून त्यांना त्यांच्या पत्नी मंदा खडसे तसेच त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना हेतुपुरस्कर त्रास देण्याचे काम केंद्र सरकार कडून केले जात असल्याचा आरोप यावेळी या कार्यकर्त्यांनी केला.भोसरी येथील ज्या जमिनीचा व्यवहार अधिकृत झालेला असून त्याच्याशी एकनाथ खडसे यांचा काहीही संबंध नाही. त्याच प्रमाणे २०१६ पासून या प्रकरणाची पाच वेळा चौकशी पूर्ण झाली असून न्यायमूर्ती झोटिंग कमिटीआयकर विभागयांच्या कडून चौकशी पूर्ण होऊन एसीबी मार्फत क्लोजर रिपोर्ट सुद्धा पुणे येथे कोर्टात सादर केलेला आहे. तरीही ईडी च्या माध्यमातुन खडसे कुटुंबीयांना नाहक त्रास दिल्या जात असल्याचा आरोप यावेळी या कार्यकर्त्यांनी केला.


Post a Comment

0 Comments