Header AD

लॉजिस्टिक टेक स्टार्टअप पिकरची १२ दशलक्ष डॉलरची निधी उभारणी

मुंबई, १७ ऑगस्ट २०२१ : पिकर या लघु आणि मध्यम व्यवसायांना (एसएमबी) पूर्ण लॉजिस्टिक्स आणि वेअरहौसिंग सोल्युशन प्रदान करणा-या सास-आधारीत लॉजिस्टिक टेक स्टार्टअप पिकरने आयआयएफएल, अॅमिकस कॅपिटल आणि अनंत कॅपिटलच्या नेतृत्वात सीरीज बी राउंडमध्ये १२ दशलक्ष डॉलरची निधी उभारणी केली आहे. सध्याच्या गुंतवणूकदारांमध्ये ओमिडयार नेटवर्क इंडिया आणि गिल्ड कॅपिटलनीही डेक्सटर कॅपिटलद्वारे व्यवस्थापित झालेल्या या फेरीत भागीदारी केली.      पिकरने २०२१ मध्ये दैनंदिन ऑर्डरमध्ये ३ पटींची वाढ अनुभवली आणि या प्लॅटफॉर्मवरील ऑर्डरचे प्रमाण सतत वाढतच आहे. कंपनी आपल्या प्लॅटफॉर्मवर ५०,०००+ विक्रेत्यांना कोणत्याही अडचणीशिवाय एंड-टू-एंड लॉजिस्टिक्स आणि डेटा ड्रिव्हन इनसाइट्स प्रदान करण्यासाठी एआय आणि एमएलच्या शक्तीचा वापर करते.        कंपनी सध्या भारतात २९,०००+ पिनकोड्स आणि जगभरात २२० ठिकाणांहून शिपिंग करते. अॅमेझॉन, शॉपीकाई आणि वूकॉमर्स सारख्या २५ पेक्षा जास्त ऑनलाइन प्लॅटफॉर्मसह याचे वन-क्लिक इझी इंटिग्रेशन असून याद्वारे पिकर हे एसएमबींसाठी एक लोकप्रिय ई कॉमर्स फुलफिलमेंट प्लॅटफॉर्म ठरते.          कंपनी फंडिंगच्या मदतीने प्रॉडक्ट डेव्हलपमेंटला प्रोत्साहन देणे आणि देशभरातील फुलफिलमेंट सेंटर्सला नेटवर्कचा भाग बनवण्याचे काम सुरूच ठेवेल. पिकरचे सोल्युशन रिटेलर्स, मार्केटप्लेस विक्रेते आणि डी२सी ब्रँड्ससह एसएमबी यांना त्यांचा डिलिव्हरी परफॉर्मन्स आणि इन्व्हेंट्री मॅनेजमेंटमध्ये सुधारणा करण्यास मदत करेल.         पिकरचे सह संस्थापक आणि सीईओ रितिमान मजूमदार म्हणाले, “पिकरचा दृष्टीकोन लॉजिस्टिक्समध्ये येणाऱ्या समस्या दूर करत ही प्रणाली वेगवान करण्याचा आहे. या नव्या निधीमुळे थेट सोल्युशन देण्याच्या आमच्या मार्गाला आणखी बळकटी मिळेल. लॉजिस्टिक्स ऑटोमेशनकरिता तंत्रज्ञानाचा वापर करत प्रत्येक ई कॉमर्स विक्रेत्याला डिलिव्हरीचा कालावधी ५-६ दिवसांवरून कमी करत सुमारे १-२ दिवसांपर्यंत आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.          आमच्या एंडटूएंड लॉजिस्टिक सेवेद्वारे आतापर्यंत केवळ एका क्लिकसह लहान व्यवसायांपासून डी2सी ब्रँडपर्यंत कोणालाही आपले ई कॉमर्स ऑपरेशन्स अडथळ्याविना करता येऊ शकते. जस-जसे जास्तीत जास्त एसएमबी ऑनलाइन होतील, तशा आमच्यासारख्या एंडटूएंड लॉजिस्टिक्स सेवांची आवश्यकता वेगाने वाढएल. यामुळे आम्हाला आमच्या ग्राहकांसोबत काम करण्याची उत्कृष्ट संधी मिळेल.”

लॉजिस्टिक टेक स्टार्टअप पिकरची १२ दशलक्ष डॉलरची निधी उभारणी लॉजिस्टिक टेक स्टार्टअप पिकरची १२ दशलक्ष डॉलरची निधी उभारणी Reviewed by News1 Marathi on August 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads