संताचे विचार आजही समाजाला प्रेरणादायी - सजय केळकर
ठाणे , प्रतिनिधी  : महाराष्ट्राला संताची खूप मोठी परंपरा लाभली असून संत परंपरेचा वारसा आजही समाजाला प्रेरणादायी असून ही परंपरा आपन जोपासली पाहिजे असे विचार आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले.             माळी समाज संस्थेच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराज यांचा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे,महाराष्ट्र प्रदेश भा.ज.पा.सचिव व नगरसेवक संदिप लेले,ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण,माळी समाज अध्यक्ष सचिन शिंदे,कार्याध्यक्ष सचिन केदारी,काँग्रेस नेते सुखदेव घोलप,निलेश शेंडकर,राहुल पिंगळे कृष्णा भुजबळ,सरचिटणीस नवनीत सिनलकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.             या प्रसंगी बोलताना मनोज शिंदे यांनी सांगितले ठाण्यातील माळी समाज आज समाजामुख कार्यक्रम करित असताना ठाण्यात क्रातीसुर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फूले यांच्या स्मारकाकरिता अधिक प्रयत्न करायला पाहिजे असे सागितले संदिप लेले यांनीही आपले विचार मांडताना आज जी स्रि व पुरुष यांची समानता दिसत आहे त्याचा मूळ पाया महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फूले यांनी रचला असून आज जी स्त्रियांची प्रगती त्याचे सर्व श्रेय सावित्रीबाई यांना जात असल्याचे सागितले.          या कार्यक्रमात जेष्ठ बांधव प्रभाकर राऊत,जालिंदर वाघुले,अशोक राऊत,संजीवनी संते,जयश्री रामाणे,शिवाजी पिंगळे,गणेश डोके,गणेश थोरात,श्रीधर रासकर,राहुल वाघमारे, विलास ताठे, चेतन बटवाल,राजेद्र देसाई,शशिकांत बधे,अरुंधती डोमाळे,अनुजा गायकवाड,नलिनी वाघुले,अनुराधा राऊत,सुजाता इळवे,मनिषा बनकर,बंडू राउत,गोरी सिनलकर,अर्चना बाळसराफ आदि समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments