राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त आंतर राष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बिर्ला महाविदयालयातर्फे आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी भारत सरकार क्रीडा दिनाचे आयोजन करते. बिर्ला महाविद्यालयाच्या वतीने आयोजित या परिसंवादातभारत आणि इतर दहा देशांतील ४८ क्रीडाप्रेमी आणि क्रीडा संशोधकांनी आपले शोध निबंध सादर केले. या सेमिनारमध्ये ३५० हून अधिक लोकांनी सहभाग घेतला.
बिर्ला महाविदयालय यंदा आपल्या स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे,  तसेच महाविद्यालयाचे संस्थापक बसंतकुमार बिर्ला यांचे जन्मशताब्दी वर्ष देखील साजरे केले जात आहे. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीनवी दिल्लीचे सहसचिव डॉ.बलजितसिंह सेखोनया सेमिनारचे प्रमुख पाहुणे होते आणि सुबोध तिवारीसीईओकैवल्यधामा योग केंद्राचे बीज वक्ता म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ.नरेश चंद्र म्हणाले की आज खेळांना अभ्यासक्रमाचा प्रमुख भाग बनवण्याची गरज आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश पाटील यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. 

परदेशातील विद्वान ज्यांनी या कार्यक्रमात आपले विचार मांडले त्यामध्ये डॉ लिम बून हुईसेंटर फॉर स्पोर्ट्स अँड एक्सरसाइज सायन्समलेशिया विद्यापीठमलेशियाडॉ. मॅन्डी डेटलामिंदानाओ स्टेट युनिव्हर्सिटीफिलिपिन्सडॉ. एस. सब्बनाथजाफना विद्यापीठश्रीलंकाइंडोनेशियाबांगलादेशव्हिएतनाम आणि जपान सारख्या देशांतील दहा लोकांनी आपले विचार सादर केले.
यासहभारताच्या विविध राज्यांतील क्रीडा तज्ज्ञ डॉ.नीता बंदोपाध्यायकल्याणी विद्यापीठपश्चिम बंगालडॉ.नीलीमा देशपांडेएनआयएस. पटियालाडॉ. जान्हवी इच्छापुरीयाआरो विद्यापीठगुजरातडॉ. किरण सुसान चेरियन, I.C.M. आर. हैदराबाद, सुब्रत डेनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समणिपूरडॉ योगेश कुमारमेरठ (यूपी)प्रा. वासंती काधीरवनमुंबईडॉ. बळवंत सिंहठाणेडॉ. जयवंत मानेखोपोलीडॉ. मनोहर मानेविभाग प्रमुखशारीरिक शिक्षण विभागमुंबई विद्यापीठमुंबईडॉ. भास्कर साळवीऔरंगाबादडॉ. घनश्याम ढोकराटमुंबईडॉ. किरण मारूमुंबई इत्यादी लोकांनी आपली मते व्यक्त केली.


 


या चर्चासत्राचे आयोजक डॉ.हरिश दुबे यांनी सर्व पाहुण्यांचे आभार व्यक्त केले. यज्ञेश्वर बागरावडॉ दत्ता क्षीरसागरकिरण रायकरअनिल तिवारीभरत बागुलडॉ दिनेश वानुलेमधु शुक्रे आदी प्राध्यापकांची विशेष भूमिका होती.

Post a Comment

0 Comments