राहनाळ जिल्हा परिषद शाळेत दिपपूजन उत्सव साजरा
कल्याण , कुणाल म्हात्रे : जिल्हा परिषद केंद्र शाळा राहनाळ येथे आँनलाईन दिपपूजन उत्सव साजरा केला. यावेळी अजय पाटील यांनी अग्नीचा उगमदिव्यांचे बदलते रुप यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. रसिका पाटील यांनी लक्ष्मी अलक्ष्मीची कथा सांगून प्रकाश हा आपल्या जीवनात आनंद निर्माण करतो म्हणून हा दिवस दिपपूजन म्हणून साजरा केला पाहिजे. संध्या जगताप मँडम यांनी दिपपूजनचे महत्त्व सांगून दिव्यांची आरासदिव्यांची पुजा कशी करावी यासाठी व्हिडीओ सादर केला.मीत कडूसोहम झगडे या विद्यार्थ्यांनी दिपपूजनची माहिती सांगितली. अजय पाटील यांनी तमसोमाज्योतिर्गमयचा अर्थ स्पष्ट  केला. विद्यार्थ्यांना आपल्या जीवनातील अंधकार ज्ञानाचा उजेड पाडून दूर करावा असाही सल्ला दिला. शेवटी एकाच वेळी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी दिवे प्रज्वलीत करुन शुभंकरोती कल्याणम् हे गीत सादर करून दिपोत्सव साजरा केला. या कार्यक्रमाचे गटशिक्षणाधिकारी निलम पाटीलशिक्षण विस्तार अधिकारी संजय अस्वले यांनी कौतुक केले आहे. या कार्यक्रमाची संकल्पना अजय पाटील यांची होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन अनघा दळवी यांनी केले.


Post a Comment

0 Comments