शिवसेना नेत्यांना प्रतिकार करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांचा भाजपतर्फे सत्कार
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : भाजपा कार्यलयावर हल्ला करणाऱ्या शिवसेना नेत्यांना प्रतिकार करणाऱ्या प्रताप टूमकर आणि वैभव सावंत या भाजप पदाधिकाऱ्यांचा भाजपतर्फे जिल्हा कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, आमदार गणपत गायकवाड, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, नंदू परब, कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा चौधरी, नाना सूर्यवंशी आदींसह इतर अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.          केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधा तील शिवसेनेच्या आंदोलनाचे पडसाद कल्याणात देखील उमटले. शिवसेनेचे महानगरप्रमुख विजय साळवी व शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यानी काल कल्याण पश्चिमेकडील भाजपच्या कल्याण शहर कार्यालयाला लक्ष करत  दगडफेक करत कार्यालयाच्या काचा फोडल्या. दगडफेकीस प्रतिकार करणाऱ्या दोन भाजपा कार्यकर्त्यांना देखील बेदम मारहाण केली.याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आला आहे. काल भाजप कार्यलयावर दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्याचा शिवसेनेने सत्कार केला होता. त्यानंतर आता शिवसेना नेत्यांना प्रतिकार करणाऱ्या भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष प्रताप टूमकर व वैभव सावंत या दोन्ही कार्यकर्त्यांचा भाजप जिल्हा कार्यलयात भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार गायकवाड यांनी हा सत्कार नसून सन्मान असल्याची प्रतिक्रिया दिली.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला देशाचा स्वातंत्र्य दिवस कितवा हे माहीत नसणं खूप मोठं दुर्दैव आहे. अतिशय खेदजनक बाब आहे आणि त्यावर फक्त प्रतिप्रश्न विचारला म्हणून केंद्रीय मंत्र्याला सूडबुद्धीने अटक करणं हे कोणत्या लोकशाहीमध्ये धरून आहे. या घटनेवरून पूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरणेतोडफोड करणे, मारहाण करणे या गोष्टीचा जाहीरपणे निषेध करीत असल्याचे जिल्हाध्यक्ष शशीकांत कांबळे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments