शिवसेनेच्या माध्यमातून नांदिवलीतील ४०० नागरिकांचे लसीकरण
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कोरोनापासून बचावासाठी लसीकरण महत्त्वाचे असून पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आणि कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदिवली गावच्या प्रथम महिला सरपंचशिवसेनेच्या कल्याण उपशहर विधानसभा महीला संघटक रिना सुभाष ढोणे यांच्या माध्यमातून कल्याण पूर्वेतील नांदिवली येथील ४०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.          २७ गावांमध्ये येणाऱ्या नांदिवली येथे लसीकरण केंद्र नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. नागरिकांसाठी शिवसेनेच्या कल्याण उपशहर विधानसभा महीला संघटक रिना सुभाष ढोणे यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून नांदिवली येथील बी.टी गायकवाड शाळेत लसीकरण केंद्र सुरु केले असून पहिल्या दिवशी ४०० नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यापुढे देखील या केंद्रावर लस उपलब्ध होणार आहे.या लसीकरणासाठी सुभाष ढोणे, शिवसेनचे उपविभाग प्रमुख दत्ता शिंदेगटप्रमुख राजु कित्तुरकरसमाजसेवक संपतं बिरामणेराजेश जाधव, आण्णासाहेब कांबळेशिवाजी यादवअर्जुन चव्हाण,संजय पाटीलसर्व शाळेतील कर्मचारी वर्ग पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments