रक्त टंचाई दूर करण्यात निरंकारीभक्तांचे निरंतर योगदान ४४९ निरंकारी भक्तांचे उत्साह पूर्ण रक्तदान
कल्याण, कुणाल म्हात्रे  संत निरंकारी मिशनचा वतीने नेव्ही नगर व नालासोपारा येथील निरंकारी सत्संग भवनांमध्ये रविवारी आयोजित दोन रक्तदान शिबिरांमध्ये अनुक्रमे २०० व २४९ अशा एकूण ४४९ निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले.          निरंकारी भक्तांना त्यांच्या सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज निरंतर हीच शिकवण देत आहेतकी 'रक्त धमण्यांमध्ये वहावेनाल्यांमध्ये नकोतसेच जीवन तेव्हाच महत्त्वपूर्ण होते जेव्हा ते इतरांसाठी जगले जातेही शिकवण जीवनात धारण करून हे भक्तजन निरंतर मानवतेच्या सेवेत आपले योगदान देत आहेतकोरोना महामारीच्या काळात जाणवत असलेली रक्त टंचाई दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयास करत आहेत.        नेव्ही नगर येथील शिबिरात संत निरंकारी रक्तपेढ़ीने २०० युनिट रक्त संकलन केले तर नालासोपारा येथे नायर हॉस्पिटलच्या रक्तपेढ़ीने १३७ यूनिट व संत निरंकारी रक्तपेढ़ीने ११२ यूनिट रक्त संकलित केले.   नेव्ही नगर येथील शिबिराचे उद्घाटन मंडळाचे सेक्टर संयोजक बाबूभाई पांचाळ यांनी केलेया शिबिराला स्थानिक आमदार माननीय राहुल नार्वेकर यांनी सदिच्छा भेट दिली आणि शिबिराचे  अवलोकन करून संत निरंकारी मिशनच्या मानवतावादी कार्याची स्तुती केलीयावेळी मंडळाचे अनेक सेवादल अधिकारी व स्थानीय प्रबन्धक गण उपस्थित होते.          नालासोपारा शिबिराचे उद्घाटन मंडळाचे नाशिक जोन क्षेत्रीय प्रभारी जनार्दन पाटिल यांनी केले.  यावेळी उपस्थित समाजिक कार्यकर्ता निलेश चौधरी यांनी संत निरंकारी मिशन च्या कार्याचे कौतुक केले.  शिबिरात संत निरंकारी सेवादलचे अनेक अधिकारी आणि स्थानिक प्रबन्धकगण उपस्थित होते. या दोन्ही शिबिरांची सुंदर व्यवस्था मंडळाचे स्थानिक मुखीसेवादल अधिकारी आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे स्वयंसेवक यांनी एकोप्याने केले.

Post a Comment

0 Comments