जागतिक किर्तीचे शिल्पकार सदाशीव (भाऊ) साठे यांचे ९५ व्या वर्षी निधन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : जागतिक किर्तीचे शिल्पकार सदाशीव (भाऊ) दत्तात्रय साठे यांचे आज वयाच्या 95 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. तीन दिवसांपासून त्याची प्रकृती ठिक नव्हती. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृति खालावल्याने त्यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच कला जगतात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने शिल्पकलेच्या क्षेत्रात  निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही अशी प्रतिक्रिया कला जगतातील मान्यवरांकडून व्यक्त केली जात आहे.भाऊ साठे हे जुन्या कल्याणातील गांधी चौकातील साठे वाड्यात ते रहात असत. त्यांच्या पश्चात मुलगामुलगीसूनानातवंडेभाऊ असा परिवार आहे. पत्नी नेत्राताई साठे चित्रकार लेखिका व नाट्य कलावंत होत्या त्यांचे या अगोदरच निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. भाऊ साठे यांचा जन्म १७ मे १९२६ रोजी झाला होता. भाऊंनी दिल्लीत 1954 साली गांधीजींचे शिल्प उभारले.  त्यांचे भाऊ डॉ. श्रीनिवास साठे हे इतिहास अभ्यासक आहेत. तर दुसरे बंधू वामनराव साठे हे जनता सहकारी बँकेचे संस्थापक आहेत. साठे कुटुंबीय आणि कला यांचे अतूट नाते आहे. त्यांच्या घराण्यात प्रत्येकाकडे कला आहे.सदाशिव साठे हे 1944 साली मॉडेलिंग शिक्षण घेण्यासाठी मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये दाखल झाले. काका हरी रामचंद्र साठे हे त्यांचे प्रेरणास्थान होते. ते गणपती करत असत. तेथे भाऊंनी आपला श्रीगणेशा केला पुढे 1948 साली भाऊ डिप्लोमा घेऊन बाहेर पडले. सन 1950-51 सालाच्या काळात राजकमल येथे नोकरी करून पुढे त्यांनी 52 साली शिल्पकलेसाठी दिल्लीवर स्वारी केली. दिल्ली नगर निगमने त्यांच्यावर महात्मा गांधींचा पुतळा करण्याचे काम सोपविले. तेथून त्यांच्या शिल्पकलेच्या (व्यावसायिक) जीवनाला सुरुवात झाली.  भाऊंनी दिल्लीत 1954 साली गांधीजींचे शिल्प उभारले. त्यानंतर 2014 मध्ये गुजरात राज्यातील दांडी येथे महात्मा गांधी यांचे शिल्प उभारले.              छत्रपती शिवाजी महाराजस्वामी विवेकानंदपंडित जवाहरलाल नेहरूराणी एलिझाबेथलॉर्ड माऊंटबॅटननेताजी सुभाषचंद्र बोसअटलबिहारी वाजपेयीपंडित दीनदयाळ उपाध्याय यांची भाऊ साठे यांनी शिल्पे उभारली आहेत. शिल्प तयार करण्याबाबत याच भाऊंनी आकार नावाने पुस्तकही लिहिले आहे. हे पुस्तक शिल्पकलेच्या अभ्यासकांना मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांत उपलब्ध आहे.              मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे 64 वर्षांपूर्वी उभारेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा याच भाऊ साठे यांनी उभारला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विनंतीवरुन अवघ्या सहा महिन्यांत भाऊंनी हा पुतळा उभारला आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरातून आलेले पर्यटक या शिल्पाजवळ सेल्फी घेत असतात.               भाऊंनी डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 1 मध्ये एक शिल्पालय उभारले आहे. त्यात त्यांची शिल्पे ठेवली आहेत. शिल्पकलेत करिअर करू इच्छिणाऱ्या भावी शिल्पकारांना मार्गदर्शक ठरू शकतात असे हे शिल्पालय मानले जाते. साठे यांना पद्म पुरस्कार मिळण्याकरिता कल्याणमधील कलावंतरसिक यांनी मागणी केली होती. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेनेही पद्म पुरस्कारासाठी सरकारदरबारी शिफारस करण्याचे मान्य केले होते.                या सगळ्या पाठपुराव्यानंतरही साठे यांचे नाव पद्म पुरस्काराच्या यादीत समाविष्ट झाले नाही. स्वत: साठे यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी घनिष्ठ संबंध होते. शिल्पकलेच्या या पूजकाच्या पार्थिवावर कल्याणमधील स्मशानभूमीत संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिकराजकीयकलाक्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.कल्याण शहरातील अत्यंत मौल्यवान हिरा आज काळाच्या पडद्या आड गेला. भाऊंनी शिल्पकार म्हणून  आपल्या दाशातच नव्हे तर परदेशातही अनेक ठिकाणी अनेक मान्यवरांची शिल्पे उभारली आहेत. आजही त्यांनी उभारलेली शिल्पे व नवीन पिढीला प्रोत्साहित करीत असतात. गेट आ इंडिया समोरील अश्वारूढ छत्रपती शिवरायांचा पुतळा हा भाऊ साठे यांनी उभारला असून तो त्यांच्या कलेची साक्ष देत असतो. भाऊ साठे हे उत्तम वाचकही होते. त्यांचे संग्रही अनेक उत्तोमत्तम पुस्तकांचा साठा असून त्यांनी शिल्पकलेव दोन पुस्तके प्रकाशित केली आहेत. अतिशय मनमिळाऊ व अभ्यासू व्यक्ती मत्व आज आपल्या मधून निघून गेल्याचे फारच दुःख होत असल्याची प्रतिक्रिया सार्वजनिक वाचनालय कल्याणचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments