एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा राज्याच्या विकासाकडे लक्ष द्या'


उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला 'हासल्ला'...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांनी एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे असे मत केंद्रीय सामाजिक विकास मंत्री रामदास आठवले यांनी कल्याणात व्यक्त केले. कल्याणातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते देवचंद अंबादे यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी ते कल्याणात आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड, रिपाईचे जेष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे, दयाल बहादुरे, भारत सोनावणे आदींसह इतर अनके पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.राज्याच्या राजकारणात शिवसेनाकाँग्रेस राष्ट्रवादीने महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता स्थापन केलेली आहे. पण गेले अनेक वर्षे शिवसेना भाजप एकत्र राहिली आहे. आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये. मला असं वाटत की शिवसेनाभाजप आणि आरपीआय महायुती सरकार पुन्हा येऊ शकते. अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर पुन्हा चर्चा होऊ शकते. एकत्र बसून पुन्हा काही मार्ग काढता येतो का त्यावर चर्चा होऊ शकते. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटला पाहिजे. अशा पध्दतीचे वाद आपल्याला चालणार नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. केंद्र आणि राज्यमार्फत हा वाद मिटला पाहिजे. नारायण राणे यांच्यावर अशा पद्धतीने कारवाई हा अन्याय असून  बोलले म्हणून अशा पध्दतीने कारवाई करणे योग्य नाही.  राणेंची भाषा ही शिवसेनेची भाषा असून त्यांचें आयुष्य शिवसेनेत गेलेलं आहे. त्यांचे एवढे वक्तव्य गंभीरपणे घेण्याची गरज नव्हती. दोघांकडून एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे आठवले यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments