दिव्यांगांच्या नव्या कोऱ्या व्हीलचेअर भंगारात

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 15 हजार दिव्यंगाची नोंदणी असून या दिव्यागाच्या सोयीसाठी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात या व्हीलचेअर गायबच होत्या आता दोन वर्षानंतर या व्हीलचेअर पालिकेच्या ब प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या टेरेसवर अडगळीत धूळ खात पडून असून या नव्या कोऱ्या व्हीलचेअरना गंज चढला आहे. मात्र या व्हीलचेअर इथे कुणी आणि का ठेवल्याआणि त्याचे काय करायचे  याबाबत पालिकेच्या अधिकार्यांनाप्रांताधिकार्यांना कोणालाही कसलीही माहिती नसल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे.निवडणुकीच्या मतदानासाठी अनेक ठिकाणी मतदान बूथ पहिल्या किंवा दुसर्या मजल्यावर असल्याने दिव्यांग मतदाराचे हाल होत असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत निवडणूक विभागाने प्रत्येक बुथवर किमान 1 व्हीलचेअर उपलब्ध करून देण्याचे आदेश देत त्यादृष्टीने व्हीलचेअरचे नियोजन शासनाकडून करण्यात आले होते. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील काही बुथवर दिव्यांग बांधव भगिनीना मतदार करण्यासाठी या चेअर उपलब्ध करून देण्यात आल्या असल्या तरी अनेक बुथवर चेअरच नसल्याच्या तक्रारी त्यावेळी मतदारांनी केल्या होत्या.मात्र निवडणूक संपल्या नंतर या व्हीलचेअरचे नेमके काय झाले याची कोणी चौकशी देखील केली नाही. निवडणुकीला दोन वर्षे उलटून गेल्यानंतर या खुर्च्याचा प्रशासनाला विसर पडला होता मात्र आता या खुर्च्या प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या टेरेसवर अडगळीत सापडल्या आहेत. दोन वर्षापासून अडगळीत पडलेल्या या खुर्च्यांना गंज चढला आहे. मात्र त्या खुर्च्याचे काय करायचे याबाबत कोणत्याही सूचनाच नसल्याने या खुर्च्या पडून आहेत. याबाबत पालिकेच्या अधिकार्यांनाप्रांताधिकार्यांना आणि निवडणूक विभागाच्या अधिकार्यांना विचारले असता कोणालाही या खुर्च्या तिथे पडून आहेत याची माहिती देखील नाही.जर या खुर्च्या निवडणुकी नंतर गरजू दिव्यांग बांधवांना दिल्या गेल्या असत्या तर त्याची गरज पूर्ण झाली असती मात्र शासनाच्या निधीतून खरेदी केलेल्या या खुर्च्या गंज चढल्याने फुकट गेल्या असतानाही कोणालाही त्याचे काहीही वाटत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शासनाच्या निधीचा अपव्यय करणाऱ्या संबधितावर कारवाई करण्याची मागणी नागरिकाकडून केली जात आहे. 


Post a Comment

0 Comments