डिझायर फाऊंडेशनने साजरा केला अनाथ आश्रमातील मुलांसोबत स्वातंत्र्यदिन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : डिझायर फाऊंडेशन ने कल्याण मधील साद फाऊंडेशन मानव चिल्ड्रन्स होम मधिल चिमुकल्यांसोबत स्वतंत्र दिन साजरा केला. मुलांना विविध विषयांवर मार्गदर्शन आणि अल्प उपहार देण्यात आले. वेळोवेळी मदत करणारे आणि सामाजिक कामात योगदान देणारे विपुल सुरोशे, विद्या गवाले, हिना मुल्ला यांचा युवा रत्न म्हणून संगीता सत्यम यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी,सागरअक्षयपद्माकर, रमेशत्रितेजशेखरविकी आदी सदस्य आणि डिझायर संस्थेचे अध्यक्ष कमलेश भोईर उपस्थित होते. डिझायर संस्था मदत करत असते तसेच ठाणे जिल्ह्यातील  अनाथ आश्रम आणि लहान मुलांसाठी विविध उपक्रम भविष्यात करण्याचे डिझायर फाऊंडेशनचे  धेय्य असल्याचे संस्थेचे अध्यक्ष कमलेश भोईर यांनी सांगीतले.

Post a Comment

0 Comments