करोडोंच्या सिटी पार्क नजीकच्या स्मशान भुमीची दुरावस्था
कल्याण , कुणाल  म्हात्रे :  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या करोडोंच्या सिटी पार्क नजीकच्या स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे करोडोंचे प्रकल्प उभारणारे केडीएमसी प्रशासन नागरिकांची मुलभूत गरज असलेल्या स्मशानभूमीच्या दुरावस्थेकडे कधी लक्ष देणार असा सवाल नागरिक करत आहेत.   


कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा गांवापासून एकदिड किलोमीटर लांब असलेल्या या स्मशानभुमीत वीज,पाणीरस्ता यापैकी काहीच सुविधा नसल्यामुळे अंत्यसंस्कारात अडचणी येत आहेत. रात्रीच्या वेळी कुणी मयत झाला तर मोटार सायकलच्या उजेडात अंत्यसंसकार उरकावे लागत आहेत. गेल्यावर्षी असा प्रसंग उद्भवला होता त्यावेळी दुचाकीच्या हेडलाईटच्या उजेडात क्रियाकर्म उरकावे लागले होते.गेल्या मे महिन्याच्या केवळ वीस दिवसात कोरोनासह विविध व्याधींमुळे गांवातील पांच नागरीकांचा मृत्यू झाला असता असुविमुळे अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे रस्ता, पाणी, वीज या सुविधा त्वरीत पुरवण्याची मागणी होत आहे. जुलैच्या वादळवार्‍यात स्मशानावरील पत्रेही ऊडून गेली असल्याने या स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे.यासंदर्भात महापालीकेला अनेकवेळा अर्ज विनंत्या केल्या आहेत. मात्र सुधारणा होत नाहीत असे गौरीपाडा गांवचे पोलीसपाटील रघूनाथ म्हात्रे-पाटील यांनी सांगीतले तर याबाबत मनपाच्या ब प्रभाग अधीकार्‍याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

Post a Comment

0 Comments