अंतरंग मधील कविता सकारात्मक वृत्तीने भारलेली- प्रा.प्रविण दवणे इशा कुलकर्णी यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : अंतरंग काव्यसंग्रहातील कविता सकारात्मक वृत्तीने भारलेली आहे असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिककवी व  गीतकार प्रा. प्रविण दवणे यांनी केले. इशा कुलकर्णी यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन प्रा. प्रविण दवणे व कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते चिंतामणी हॉल मध्ये झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नरेंद्र पवार यांनी आपल्या मनोगतात इशा कुलकर्णी यांच्या कविता संग्रहात बाल किशोरांपासून जेष्ठ नागरिकांपर्यंतचे संवेदनशील भावविश्व असल्याचे सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या.मनाच्या अबोध कप्प्यात जपलेले अनेक क्षण जीवनाला जिवलग सोबत देत असतात पुष्कळदा त्या क्षणांकडे लक्ष द्यायला व्यवहारी व्यग्रतेत वेळ मिळत नाही. पण आयुष्याचे एक वळण असे येतेज्या वळणावर आयुष्याचे संचित व्यक्त करावेसे वाटते. 'अंतरंग'  काव्यसंग्रहामधून अशाच सहजसंवादी सुबोध कविता कवयित्री इशा संदीप कुलकर्णी यांनी रसिकांसाठी आणल्या असून रसिकांनी त्या वाचाव्यात असे आवाहनसुद्धा प्रा. प्रवीण दवणे यांनी केले.वयाचा स्पर्श न झालेलं तरल-कोवळं मन जपत निसर्गाच्या रंग-तरंगांचा आनंद घेत हे 'अंतरंगरसिकाच्या अंतरंगाची सहजपणे तार छेडतात. पावसाचा एकसुरीपणा कवयित्रीला जाणवत नाहीतर पावसाची अनेक रूपे सौ इशा संदीप कुलकर्णी सादर करतात. त्यात आपोआप एक लय येतेताल येतो असेही दवणे म्हणाले. 'अंतरंगमध्ये केवळ अशा बोधवादी उपदेशात्मक कविताच आहेत असे नाहीतर हळव्या प्रीतीचे अंतर्यामीचे सूर व्यक्त करणाऱ्याही अनेक कविता आहेत असे सांगून प्रा दवणे यांनी इशा कुलकर्णी यांना शुभेच्छा दिल्या.आपल्या कविता संग्रहाविषयी इशा कुलकर्णी म्हणाल्या की 'अंतरंगकाव्यसंग्रहात मानवी भावभावनांचे मनोहारी चित्रण आहे. विविध आशय-विषयांवरील या कविता वाचकांना आपल्याच कविता भासतील. आनंद, दुःखविरहप्रेममानवताचैतन्य ,अशा संमिश्र भावनांनी भरलेला हा काव्यसंग्रह आहे. बाल-किशोर यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या कवितांचा देखील यात समावेश आहे. गेली वीस वर्ष सातत्याने डायरी लिहीत असता प्रसंगानुरूप कविता स्फुरत गेल्या. क्रिएटिव्ह पेन्स प्रकाशित काव्य संगहाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ मोनिका पापरीकर तर आभार प्रदर्शन साईश कुलकर्णी यांनी केले.

Post a Comment

0 Comments