ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांना मातृशोक ८३ व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांच्या आईचे निधन
कोल्हापूर (६) : ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या आई श्रीमती मोहनाबाई आकाराम माळवी यांचे आज दिनांक ६ ऑगस्ट, २०२१ रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी अल्पशा आजाराने कोल्हापूर या मूळ गावी निधन झाले.       गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. श्रीमती मोहनाबाई आकाराम माळवी यांच्या पश्चात मुलगा, सून, नातू तसेच ४ मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.      आज वाळोली ता. पन्हाळा जि.कोल्हापूर या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments