Header AD

नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आडीवली ढोकली परिसराचे नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हस्ते गायत्री विद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक वृंद आणि व्यवस्थापनातील पदाधिकारी उपस्थित होते. 



           यावेळी पाटील यांच्या उपस्थित राष्ट्रगीत व ध्वज गीत गाण्यात आले. सरकारच्या नियमानुसार ध्वजारोहना कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. कोरोना काळात शाळा सुरु नसल्याने मुलांची उपस्थितीत अत्यंत अल्प होती. सोशल डिस्टसींगचे पालन करुन ध्वजारोहनाचा कार्यक्रम पार पडला.



यावेळी पाटील यांनी सांगितले कीत्यांच्या शालेय जीवनातील ध्वजारोहणाचा कार्यक्रम त्यांना आठवला. पाटील यांच्या स्वागताला राष्ट्रभक्ती पर गितांची धून वाजंत्रींनी वाजविली. भर पावसात हा कार्यक्रम पार पडला. त्याआधी कुणाल पाटील यांनी त्यांच्या कार्यालयासमोर ध्वजारोहण करुन राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रध्वजाला सलामी दिली.



 यावेळी समाजसेवक अनिल पाटील, नकुल भोईर, राकेश म्हात्रे आदींसह  कार्यकर्ते आणि महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते. पाटील यांनी स्वातंत्र्यांचा दिन चिरायू होवो अशा शुभेच्छा दिल्या. तसेच नागरीकांना मिठाई आणि मुलांना चॉकलेटचे वाटप केले.


नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण Reviewed by News1 Marathi on August 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads