कल्याण मध्ये सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पूर्व भागातील कल्याण मलंग रस्त्यावर असलेल्या एका दुकानाबाहेर झोपलेल्या सूरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. निलेश घोष असे सुरक्षा रक्षकाचे नाव असून त्याच्यावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरु आहे.           सीसीटीव्हीच्या सहाय्याने निलेशला मारहाण करणा:या आरोपींचा मानपाडा पोलिस शोध घेत आहेत. नक्की निलेशवर प्राणघातक हल्ला का केला गेला हे आरोपींच्या अटके पश्चात उघड होणार आहे. ही घटना मंगळवारी पहाचे चार वाजता घडली आहे.


Post a Comment

0 Comments