महा दहीहंडी उत्सव झाला आरोग्य शिबिराचा उत्सव

 ठाणे , प्रतिनिधी  : -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी सारखे गर्दी जमवणारे उत्सव यावर्षीही साजरे न करता साधेपणाने करावे या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ठाणे जांभळी नाका येथे साजरा होणारा महादहीहंडी उत्सव यावर्षीही साजरा न करता त्या ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.            ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने महादहीहंडी उत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. यंदाचे उत्सवाचे १९ वे वर्ष होते दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर न करता आरोग्य शिबिराचे आयोजन आनंद चॅरीटेबल ट्रस्ट, ठाणे महापालिका व डॉ. उमेश आलेगावकर – संपदा हॉस्पिटल, चरई, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते.              यामध्ये वय वर्ष ४५ वरील नागरिकांसाठी मोफत लसीकरण, आरोग्य तपासणी, रक्तदान, प्लाझ्मा दान, एन्टीजन टेस्ट आदीचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांनी उस्पुर्द प्रतिसाद दिला.  छत्रपती शिवाजी महाराज, स्व. मीनाताई ठाकरे, स्व. बाळासाहेब ठाकरे व गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पाहार करून या आरोग्य शिबिरास सुरुवात करण्यात आली.           त्यावेळी पालकमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे , आमदार रवींद्र फाटक , महापौर नरेश मस्के, उपमहापौर पल्लवी पवन कदम, माजी महापौर सौ.मीनाक्षीताई शिंदे, महिला संघटक सौ. स्मिता इंदुलकर, वंदना डोंगरे, नगरसेविका सौ. नंदिनी राजन विचारे, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती सभापती संजय भोईर, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, माजी नगरसेवक मंदार विचारे, परिवहन सभापती विलास जोशी, उप आयुक्त शंकर पाटोळे, तसेच शिवसेना व युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.           तसेच डॉ. जाधव कळवा हॉस्पिटल डीन, डॉ. मिलिंद आणि त्यांचे कर्मचारी, संपदा हॉस्पिटलचे डॉ. उमेश आलेगावकर व त्यांचे कर्मचारी, ठाणे महापालिकेच्या आरोग्य सेविका डॉ. अश्विनी देशपांडे व आरोग्य कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.


Post a Comment

0 Comments