डोंबिवलीतील झोमॅटो डिलिव्हरी बॉयची मनसेकडे धाव

 डोंबिवली ( शंकर जाधव ) झोमॅटो  कामगारांना न्याय मिळावा यासाठी डोंबिवलीतील ३५०   कामगार गेले ५ दिवस संपावर होते. कामगारांच्या प्रश्नांकडे कंपनी दुर्लक्ष करत असल्याने कामगारांनी मनसे डोंबिवली शहराशी संपर्क साधला असता  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा  आमदार प्रमोद ( राजु)  पाटील यांच्या सुचनेनुसार त्या सर्व कामगारांसाबत श्रमिकगड दादर येथे  कर्मचारी सेना सरचिटणीस गजानन राणे  यांच्या कार्यालयात बैठक पार पडली.       या बैठकीत कामगारांचे विषय समजुन घेतल्यावर राणे यांनी  सर्वतोपरी मदत करु असे सांगितले तसेच तात्काळ कंपनीला त्या संदर्भात पत्र लिहीले. या प्रसंगी डोंबिवली शहर सचिव अरुण जांभळे, माजी उपविभाग अध्यक्ष संदीप ( रमा ) म्हात्रे, चिटणिस अमोल पिसाळ, महाराष्ट्र सैनिक प्रेम पाटील,विक्की चौधरी, अतुल अम्रे , महेश वडगाव, समिर चाळके, झोमेटोचे कामगार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments