कल्याण डोंबिवलीत ५६ नवे रुग्ण तर २४ रुग्णांना डिस्चार्ज




कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ५६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत २४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एकही मृत्यू झाला नाही.



आजच्या या ५६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४० हजार ६८८  झाली आहे. यामध्ये ५७८ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३७ हजार ३८२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 



तर आतापर्यत २७२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ५६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-९,  कल्याण प – ११,  डोंबिवली पूर्व – २१ डोंबिवली पश्चिम – २०, मांडा टिटवाळा – ४ तर मोहना येथील १ रुग्णाचा समावेश आहे.

 

Post a Comment

0 Comments