९५ कुटुंबियांचा पाणी प्रश्न सुटेना...रहिवाश्यांचा पालिका कार्यालयावर मोर्चा...
डोंबिवली ( शंकर जाधव )२७ गावे महानगरपालिकेत समाविष्ट होऊन ५ वर्ष उलटली तरी मुलभूत सुविधांपासून गावकरी वंचित आहेत. पूर्वी गावांतील एमआयडीसीकडून पाणी पुरवठा होत होता, मात्र चार-पाच वर्षापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने गावकरी पुरते हैराण झाले आहेत. सोनारपाडा येथील साई धाम सोसायटीतील ९५ कुटुंबियांना कमी दाबाने दोन दिवसातून एकदा पाणी येत असल्याने वैतागलेल्या रहिवाश्यांनी गुरुवारी पालिकेच्या डोंबिवतील `इ` प्रभाग कार्यालयाच्या पाणी पुरवठा विभागावर मोर्चा काढला. पाणीकर घेता मग पाणी प्रश्न सोडवा असे सांगत रहिवाश्यांनी तीव्र आंदोलन करू अस इशारा दिला. यावेळी मोर्च्यात सहभागी झालेल्या मनसैनिकांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तर सोनारपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मुकेश पाटील यांनी जनतेचा पाणी प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले.

        डोंबिवली जवळील सोनारपाडा येथे पालिकेच्या  अनधिकृत नळजोडण्या तपासणी मोहिमे सुरु होती. आधीच कमी दाबाने पाणी येत असल्याने पालिकेच्या या मोहिमेवेळी साई धाम सोसायटीने विरोध करत पाणी प्रश्न पालिका सोडवू शकत नाही मग अश्या मोहिमेचा जनतेला काय फायदा असा जाब विचारला. अखेर संतापलेल्या नागरिकांनी पालिकेच्या डोंबिवतील `इ`प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढला.यावेळी मनसेचे कल्याण जिल्हा सचिव प्रकाश माने व शहर संघटक हरीश पाटील, विभाग अध्यक्ष रमेश यादव यांनी मोर्च्यात सहभागी होऊन पालिका प्रशासन व शिवसेना-भाजप यांच्यावर टीका केली.
           जनतेला पाणी देत नसला तर येत्या निवडणुकीत जनता त्यांना मतदानाच्या मध्यामामातून पाणी पाजेल असे सांगितले. काही वेळाने मोर्चेकरी आपल्या घरी गेल्यावर त्यांच्या इमारतीजवळ पालिकेचे कर्मचारी अनधिकृत नळजोडण्या तपासणीसाठी आले होते. कर्मचाऱ्यांनी या इमारतीचे एक नळजोडणी तोडली. याचा राग आल्याने येथील रहिवाशी संतप्त झाले होते. या मोहिमेला विरोध करत आधी नोटीस द्या मग तपासा अश्या शब्दात कर्मचाऱ्यांना सुनावले. यावेळी सोनारपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मुकेश पाटील यांनी सदर ठिकाणी जाऊन रहिवाशी व पालिकेच्या कर्मचाऱ्यामधील वाद मिटवला. 
             वातावरण तापू नये म्हणून कर्मचाऱ्यांनी तोडलेली नळ कनेक्शन पुन्हा जोडले.याबाबत माजी सरपंच पाटील म्हणाले, पालिकेच्या  अनधिकृत नळजोडण्या तपासणी मोहिमेसाठी सोनारपाडा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य अनंता सुदाम पाटील यांनी पालिकेला सहकार्य केले. तर येथील रहिवाश्यांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पालिकाप्रशासनाकडे पाठपुरावा करू. तसेच यागावात अनेकांना मी आतापर्यत मोफत पाणी टॅकर पुरवत होतो आणि यापुढे माझे सहकार्य राहील.पाणी पुरवठा उपअभियंता अनंत मालगुंडी यांना विचारले असता ते म्हणाले, एमाआयडीसीकडूनच कमी दाबाने पाणीपुवठा केला जात आहे.प्रशासन याकडे लक्ष देऊन नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून काळजी घेतील. 

Post a Comment

0 Comments