Header AD

शिवशंभु ऐतिहासिक लेखी परीक्षेत सहभागी होण्याचे आवाहन


वढू आळंदी ते किल्ले श्री रायगड पालखी सोहळा समितीचे आयोजन...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पुन्हा एकदा शिकण्याची संधी नागरिकांना उपलब्ध झाली असून शिवशंभु ऐतिहासिक लेखी परीक्षेत सहभागी होण्याचे आवाहन वढू आळंदी ते किल्ले श्री रायगड पालखी सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.             वढू आळंदी ते किल्ले श्री रायगड पालखी सोहळा समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवशाहीर आकाश भोंडवे पाटील यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ५ वर्षापुढील कोणीही या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहेत. स्पर्धेपूर्वी स्पर्धकांना इतिहासाचे धडे ऑनलाइन प्रणालीद्वारे शिकविण्यात येणार आहेत. जे स्पर्धक सलग पाच वर्षे अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा देतील त्यांना इतिहास विशारद पदवी प्राप्त होईल. सध्या प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम चालू असून ही पदवी युनिव्हर्सिटी मध्ये रजिस्टर्ड असणार आहे.स्पर्धेसाठी नाव नोंदणीची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०२१ असून रविवार दिनांक ३ ऑक्टोंबर रोजी परीक्षा होणार आहे. ६ ते १३ वर्ष स्पर्धकांचा छोटा गट आणि १३ ते १०० वर्ष स्पर्धकांचा मोठा गट या दोन गटांमध्ये हि स्पर्धा होणार आहे. मोठ्या गटासाठी ५१ हजारांचे प्रथम परितोषिक तर छोट्या गटासाठी २१ हजारांचे पारितोषिक असून  इतिहास श्री मानाचा पुरस्कार श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांच्याहस्ते देण्यात येईल. एकाच दिवशी सर्व जिल्ह्यात जवळपास ५० जिल्हे आणि तालुका  परीक्षा केंद्रावर शिवशंभु इतिहासिक लेखी परीक्षा होणार आहे. या स्पर्धेत जास्तीतजास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन आटपाडी तालुका प्रमुख बालाजी बाड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी संपर्क - ८८०५०८०८९६

शिवशंभु ऐतिहासिक लेखी परीक्षेत सहभागी होण्याचे आवाहन शिवशंभु ऐतिहासिक लेखी परीक्षेत सहभागी होण्याचे आवाहन Reviewed by News1 Marathi on August 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads