महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी ब्रिजि किशोर दत्त यांची नियुक्ती
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित पदाधिकारीची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. कल्याण मधील ब्रिजकिशोर दत्त यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल कल्याण मधील पदाधिकाऱ्यांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी, कल्याण पूर्व ब्लॉक अध्यक्ष शकील खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.ब्रिजिकिशोर दत्त यांचे शिक्षण लंडन विद्यापीठातून एम.बी.ए. झाले आहे. त्यानंतर ब्रिजकिशोर दत्त यांनी सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी समाजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला ते युवक काँग्रेसच्या माध्यमातून निवडणूक जिंकून भिवंडी लोकसभा अध्यक्ष झाले. त्या माध्यमातुन त्यांनी जनतेचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचे काम सलग १० वर्षे केले. त्यांच्या कामाची शैलीक्षमता आणि मनमिळाऊ स्वभाव बघून त्यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.त्यांच्या उत्कृष्ठ वक्तृत्वाने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील सुशिक्षित युवकांना काँग्रेस पक्षाविषयी माहिती देऊन त्यांना काँग्रेसशी निगडित केले.  त्यांच्या ह्या कामाची पोचपावती म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेसचे युवानेते राहुल गांधी यांनी ब्रिजकिशोर दत्त यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी नियुक्ती केली.नवीन तयार केलेल्या महाराष्ट प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेस नेते सोनिया गांधीराहुल गांधी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आक्रमक नेतृत्व प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित आणि संयमी तरुणांना काम करायची संधी दिली आहे. त्यामुळे यापुढे महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळेल. या सुशिक्षित आणि संयमी तरुणांमुळे महाराष्ट्रातील जास्तीत जास्त युवावर्ग हा काँग्रेस पक्षाकडे आकर्षित होऊ शकतो असा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस पक्षाच्या या निर्णयामुळे स्थानिक पातळीवरील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाही उत्साह वाढला आहे.

Post a Comment

0 Comments