पूरग्रस्तांच्या सेवेसाठी खासदार विचारे यांचे सक्रिय योगदान


महाड ,चिपळूणकरांच्या मदतीसाठी वैद्यकीय चमू, सफाई कर्मचाऱ्यांचा ताफा आणि अन्नधान्याची वाहने


कोकण , प्रतिनिधी  :   अतिवृष्टीमुळे महाड आणि पोलादपूर तालुक्यातील 30 गावांमधील संसार गमावलेल्या आपत्तीग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी कर्मभूमीकडून गावभूमी कडे स्वच्छता,आरोग्य आणि अन्नधान्य दानाचे पुण्यकर्म हाती घेतले आहे. रविवारी आपल्या वाढदिवसाचे झूल बाजूला ठेवत खासदारांनी महापुरामुळे आरोग्य धोक्यात सापडलेल्या नागरिकांसाठी ठाणे, नवी मुंबई, या महापालिका क्षेत्रातील 12 वैद्यकीय पथके,गावागावात स्वच्छतेसाठी 50 सफाई कामगारांच्या तुकड्या आणि  पोटाची भूक शमविण्यासाठी 15 ट्रक अन्नधान्याची वाहने बाधितांच्या घरोघरी बिनबोभाट वाटपाचे कार्य करीत आहेत.            रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये  22 आणि 23 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत सुमारे 147 गावांना त्याचा फटका बसला. तर या नैसर्गिक आपत्तीत डोंगराच्या भूस्खलनात उतारावरील आणि पायथ्याशी असलेली अनेक गावे भुईसपाट झालीत. कित्येक जिवंत माणसं गाडली गेली. या महाप्रलयंकारी आपत्तीमुळे अस्वस्थ झालेल्या खासदार राजन विचारे यांनी येथील पीडितांना आधार देण्यासाठी 15 वाहनांमधून ठाणे व नवी मुंबई , येथील  वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पथके 2 रुग्णवाहिकासह तैनात करण्यात आले.             रविवारी चिपळूण शहारातील वडनाका, वाणळी, बापटअळी, सोनार अळी, बेंडरकरअळी व नवाभैरी मोरादापूर, पेठमाप, शिवनेरी चौक,गोवळकोट ,भोईवाडी गोविंद गड परिसरातील  बाधितांच्या पोटापाण्याचा प्रश्न मोठा आहे. सर्वस्व गमावल्यांना आधार देण्यासाठी खासदार विचारे यांच्या पुढाकाराने ठाणे व नवी मुंबई येथून संकलित अन्नधान्य 15 गाड्यांच्या माध्यमातून महाड,नागरवाडी नडगव-सोमजाईवाडी तसेच चिपळूण येथील घरापर्यंत पोहोचले यावेळी विचारे यांनी आपत्तीग्रस्त बांधवांची भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करत त्यांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.


  

            याशिवाय जलजन्य रोग प्रतिबंधक औषधोपचार सुरू असून दूषित पाण्याची ही दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. याशिवाय डास ,माशा, उंदीर कुत्रे यांचा उपद्रव रोखण्यासाठी सर्वत्र धूर फवारणी करण्यात येत आहे. तसेच  खेर्डी मलेवाडी व व वाणी आळी  या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित करून नागरिकांची आरोग्य तपासणी करून औषधांचे वाटप केले          महाड आणि चिपळूणमधील घरे आणि बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात सामान आणि अन्नधान्याची नासाडी झाली. परिणामी घरासमोर आणि रस्त्याच्या कडेला पडलेले कचऱ्याचे ढीग चिखल स्वच्छ करण्यासाठी परिषदे व्यतिरिक्त नवी मुंबई महापालिकाचे तब्बल 50 सफाई कर्मचारीवृंद अविश्रांत परिश्रम घेत आहेत. या कर्मचाऱ्यांना , वॉशिंग टँकर, सक्शन मशीन व आदी साधन सामग्री पुरवण्यात आली आहे. यामुळे चिखलाचा आणि घाणीची समस्या मार्गी लागत आहे 
तळीये गावावर विशेष लक्ष: 


           तळीये गावकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या पाठीवर मायेचा हात फिरवत जीवनावश्यक वस्तू तसेच गृहोपयोगी भांडी शेगडी ,टोप ,कुकर , ताट ,वाटी ग्लास ब्लॅंकेट, चादरी , रजई यांचेही वाटप करण्यात आले. यावेळी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, ठाणे महापालिकेचे महापौर नरेश म्हस्के, उपस्थित होते


नवी मुंबईकरांचे योगदान : 


             नवी मुंबई शिवसेना जिल्हा मध्यवर्ती शाखेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात हातभार लावला. यात विरोधी पक्षनेते विजय चौगुले, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, दिलीप घोडेकर राजू पाटील, मिलिंद सुर्याराव, समीर बागवान, शहरप्रमुख विजय माने, नगरसेवक आकाश मढवी, राजू कांबळे, जितेंद्र कांबळे, सुर्यकांत मढवी, नगरसेविका नंदिनी राजन विचारे व इतर शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे .

Post a Comment

0 Comments