कोरोना कालावधीत काम केलेल्या कर्मचारी वर्गाला न्याय द्या - ठाणे काँग्रेस
ठाणे , प्रतिनिधी  :  कोरोना कालावधीत जो तो आपला जीव कसा वाचेल याचा विचार करत असताना ठाणे महानगरपालिकेच्या कोरोना विरुद्धच्या लढाईत आपला जीव धोक्यात घालून कीती मानधन मिळेल याचा विचार न करता केवळ ठाणे महापालिका प्रशासन व देशसेवेसाठी समर्पित भावनेतून 25 ते 35 वयोगटातील तरूण-तरूणीनी आपला सेवा दिली अशा कर्मचाऱ्यांचा सन्मान होण्या ऐवजी त्याना कामावरून कमी करण्यात आले अशा कर्मचारीवर्गाला न्याय द्यावा अशी ठाणे शहर काॅग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.           ठाणे शहर(जिल्हा)काँग्रेसच्या असंघटीत कामगार संघटनेच्या वतीने काॅग्रेसचे एका शिष्टमंडळाने ठाणे महापालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांची या सर्व कर्मचा-यासह भेट देऊन ही मागणी केली या प्रसंगी ठाणे काँग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे,ठाणे महानगर पालिका उपमहापौर पल्लवी कदम,ठाणे काँग्रेस असंघटीत कामगार संघटनेचे अध्यक्ष संदिप शिदे आदि मान्यवर उपस्थित होते.            याप्रसंगी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांनी सागितले की,कोविड कालावधीत अनेक आरोग्य कर्मचा-यानी कोणताही मोबदला मिळेल या अपेक्षेने काम न करता कर्तव्य भावनेतून आपली सेवा दिली,ठाण्यातील कोरोनाबाधित रूग्णाची संख्या आटोक्यात आणण्यात या कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे अशा प्रसंगी या कर्मचाऱ्यांचा सन्मान होणे अपेक्षित होते .           ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर त्याना सामावून घेणे म्हणजेच त्यांच्या कार्याचा सन्मान केल्यासारख झाले असते परंतु ठाणे महापालिकेने नियमाचा आधार घेऊन त्यांना नोकरीवरून काढून टाकले हा दुजाभाव नाही तर काय आहे?असा सवाल केला या सर्व कर्मचा-याना दोन महिन्यापासून पगार मिळत नाहीत .             कोट्यावधी रुपये आपण आरोग्यसेवेचा खर्च करित असताना अशा सेवा देणाऱ्या कर्मचा-याचाच पगार का थकवला आहे?आता हि बाब आम्ही महापौर यांच्या निदर्शनास आणून दिली आहे कीमान आता तरि या कर्मचा-यांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments