Header AD

आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार - विक्रांत चव्हाण
ठाणे , प्रतिनिधी  :  येत्या काही महिन्यांतच येणा-या ठाणे महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पूर्ण शक्तीनिशी स्वबळावर लढणार असून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आतापासून कामाला लागले पाहीजे असे वक्तव्य ठाणे शहर काॅग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांनी कार्यकर्त्याच्या बैठकीत केले.         ठाणे शहर काॅग्रेसच्या ब्लाॅक क्रमांक 8 च्या नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वितरण समारंभाचे आयोजन शहर काॅग्रेस ब्लाॅकअध्यक्ष संदिप शिदे यांनी केले होते,याप्रसंगी ठाणे शहर कॉंग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे,ठाणे जिल्हा इंटक काॅग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे,माजी नगरसेवक बशीर बापे,जेष्ठ उपाध्यक्ष भालचंद्र महाडिक,शहर काँग्रेस सरचिटणीस रविंद्र कोळी महेंद्र म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते.

         


          याप्रसंगी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी सागितले की,काँग्रेस पक्षाचे प्रत्येक प्रभागात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत तसेच पारंपारिक मतदारही आहेत पण आपला कार्यकर्ता त्याठिकाणी पोहोचला पाहिजे शहरी भागातून यापूर्वी अनेक काँग्रेसचे नगरसेवक निवडून येत असत परंतु काही वर्षांपासून आपले शहरातील आपले वर्चस्व कमी झाले असली तरि आता आपण शहरा तुनही चांगली ताकद उभी केली आहे.           त्यामुळे येणा-या निवडणुकीत एकसंघ राहाणे गरजेचे असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले जो वॉर्डातून काम करेल व त्याच्याच नावाची शिफारस करत असताना स्थानिकांची मतही विचारात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले . याप्रसंगी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांनी सागितले की,पदाधिकाऱ्यांनी आतापासून निवडणूकपूर्व कामाला लागले पाहिजे जी तयारी करायची ती आता पासून करा.            निवडणुक लढवित असताना चोहोबाजूंनी विचार करावा,एकमेकांचे हेवेदावे विसरून पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत काम केले तरच प्रत्येकाला संधी मिळेल अशा सूचना केल्या.  याप्रसंगी शहर ब्लाॅकच्या कार्याध्यक्षपदी अॅड.जावेद शेख व सौ.अर्चना गांगुर्डे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.

आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार - विक्रांत चव्हाण आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार - विक्रांत चव्हाण Reviewed by News1 Marathi on August 20, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads