केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले रविवारी पूरग्रस्त खेड आणि चिपळूणच्या पाहणी दौऱ्यावर
मुंबई दि. 6 - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले येत्या रविवारी दि.8 जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील  पूरग्रस्त खेड आणि चिपळूणला भेट देणार आहेत.             जुलैमध्ये अतिवृष्टीने खेड चिपळूण महाड मध्ये  पूरस्थिती  निर्माण होऊन मोठे नुकसान झाले आहे. मागील आठवड्यात ना रामदास आठवले यांनी महाडला भेट देऊन पाहणी केली होती. तसेच दरडग्रस्त तळये गावाला भेट दिली होती.आता संसदेच्या अधिवेशनातुन वेळ काढून येत्या रविवार दि. 8 जुलै रोजी ना रामदास आठवले खेड आणि चिपळूण मधील  पुरग्रस्तांची भेट घेणार आहेत.            खेड मधील पोसरे खुर्द बौद्ध वाडी या पूरग्रस्त  गावाला रविवारी दि.8 जुलै रोजी ना. रामदास आठवले भेट देणार आहेत अशी माहिती रिपाइंचे राज्य कमिटी सदस्य दादासाहेब मर्चंडे यांनी दिली आहे.खेड मधील पूरग्रस्त गावांना भेट दिल्यानंतर पूरग्रस्त चिपळूण शहराला ना रामदास आठवले भेट देतील.

Post a Comment

0 Comments