भाजपा शिक्षक आघाडीच्या कोकण विभाग कार्यवाह पदी विनोद शेलकर तर कल्याण जिल्हा अध्यक्ष पदी सुभाष सरोदे यांची निवड

 


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : भाजपा शिक्षक आघाडीच्या कोकण विभाग कार्यवाह पदी विनोद शेलकर तर कल्याण जिल्हा अध्यक्ष पदी सुभाष सरोदे यांची निवड करण्यात आली आहे.

भाजपा शिक्षक आघाडीकोकण विभागाची व्हर्च्युअल सहविचारसभा प्रदेश संयोजिका डॉ. कल्पना पांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हातालुकामंडळ व वॉर्ड स्तरांपर्यंत संघटना बांधणीची रचना कशी करावीसंयोजक म्हणून आपली भुमिकाजबाबदारी व कर्तृत्व काय असावं ? सध्याच्या घडीचे ज्वलंत आणि कळीचे प्रश्न म्हणजे जुनी पेंशन योजनाशिक्षक भरती प्रक्रिया व शिक्षकांच्या गुणवत्तावाढी वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण योजना  त्वरीत कार्यान्वित करणेसाठी प्रसंगी राज्यव्यापी आंदोलन उभारु असं सूतोवाच कल्पना पांडे यांनी चिंतनपर मार्गदर्शनप्रसंगी केलं.प्रदेश सहसंयोजक विकास पाटील यांनी प्रमुख अतिथी म्हणून शाळा पातळीपर्यंत गुगल फॉर्मद्वारे सभासद नोंदणी अभियान व शिक्षक मतदार नोंदणी अभियान कसं राबवायचं याचा रोडम्यापच आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केला. सभेचे प्रास्ताविक कोकण विभागाचे संयोजक एन एम भामरे सर यांनी केले. 


साघटनेने आतापर्यंत शिक्षकांचेविद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या मामांचाआंदोलनाचा आलेख मांडला. तसेच संघटना वाढीच्या दृषटीने जिल्हा संयोजक यांचं अर्थात शिक्षक आघाडीचं लेटरहेडव्हिजिटिंग कार्ड व ईमेल आयडी असावं म्हणजे पत्रव्यवहार व वैचारिक आदानप्रदान सुलभ होईल असं ठरलं.यावेळी कल्याण जिल्हा संयोजक विनोद शेलकर यांच्या आतापर्यंतच्या शिक्षकविद्यार्थी हिताय कार्याची दखल घेत कल्पणा पांडे आणि विकास पाटील यांनी विनोद शेलकर यांची कोकण विभाग कार्यवाह पदी पदोन्नती केली. तर कल्याण जिल्हा सचिव सुभाष सरोदे यांना ही त्याच्या कामाची दखल घेत कल्याण जिल्हा संयोजक पदी पदोन्नती देण्यात आली. 

Post a Comment

0 Comments