Header AD

राजकीय मंडळींकडून करोनाचे नियम न पाळल्यास गुन्हे दाखल झाले पाहिजे....जनआशीर्वाद यात्रेबाबत खासदार डॉ. शिंदे यांची मागणी
डोंबिवली ( शंकर जाधव ) करोनाची दुसरी लाट ओसरली नसून, संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. असे असताना करोनाचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर प्रशासन कारवाई करून नोटीसा बजावीत आहे. तर काहींवर गुन्हे देखील दाखल होत आहे. जर या नियमांचे राजकीय नेतेमंडळी किंवा मंत्र्यांकडून उल्लंघन केले जात असून त्यांना मात्र कायदा-नियम लागू होत नाही का ? असा प्रश्न विचारला जात आहे.           नुकतेच ठाणे जिल्ह्यात भाजपच्या वतीने केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांची  जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली.या यात्रेत करोना नियम पायदळी तुटवत गर्दी करण्यात आली.यावर कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी राजकीय मंडळींकडून करोनाचे नियम न पाळल्यास गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी केली.             ठाण्यात आयोजित करणाऱ्या यात्रेसंदर्भात आयोजकांवर ठाणे येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहे.परंतु डोंबिवलीतील कुठल्याही पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हे दाखल झाले नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.बुधवारी डोंबिवली येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे जनतेशी संवाद साधण्यासाठी आले होते.यावेळी खासदार डॉ. शिंदे यांना  जनआशीर्वाद यात्रेबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, करोनाचे नियम हे सर्वसामान्य जनतेला वेगळे आणि राजकीय नेतेमंडळीना वेगळे असे नाही.            करोना पसरू नये म्हणून सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.जर करोना नियमांचे पालन राजकीय पक्षांनी पालन केले नाहीत तर त्याच्यांवरहि कारवाई झाली पाहिजे.दरम्या,न शिवसैनिक राजेश कदम यांना विचारले असता ते म्हणाले,महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असून लोकांची गर्दी व्हावी आणि महाराष्ट्रात करोनाची तिसरी लाट यावी म्हणून  अश्या प्रकारच्या यात्रा काढल्या जात आहे.अश्या प्रकारच्या यात्रेला करोना वाटप यात्रा म्हणावे लागेल. चौकट


 ■गणेशोत्सवा आधी कोपर पूल खुला होणार...        गेली दोन वर्ष डोंबिवली पश्चिमेकडील कोपर पुल पुर्ननिर्मानाचे काम सुरु होते.पर्यायी वाहतूक व्यवस्था म्हणून वाहनचालक ठाकुर्ली उड्डाण पुलाचा वापर करत होते.मात्र हे वळसा घालून जावे लागत असल्याने वाहनचालकांना त्रासदायक होत आहे. लवकरात लवकर कोपर पूल सुरु व्हावा म्हणून डोंबिवलीकर प्रतीक्षेत होते.येत्या गणेशोत्सवा आधी कोपर पूल खुला होणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.

              

राजकीय मंडळींकडून करोनाचे नियम न पाळल्यास गुन्हे दाखल झाले पाहिजे....जनआशीर्वाद यात्रेबाबत खासदार डॉ. शिंदे यांची मागणी राजकीय मंडळींकडून करोनाचे नियम न पाळल्यास गुन्हे दाखल झाले पाहिजे....जनआशीर्वाद यात्रेबाबत खासदार डॉ. शिंदे यांची मागणी Reviewed by News1 Marathi on August 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads