भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी निर्भीड पत्रकारितेचा वारसा साप्ताहिक पोलीस समस्याने चालवावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते साप्ताहिक पोलीस समस्या चे प्रकाशन
मुंबई दि. 19 - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात भ्रष्टाचारमुक्त भारत चे उद्दिष्ट्य घेऊन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते   संपादक पंकजदादा साळुंखे यांनी सुरू केलेल्या  साप्ताहिक पोलीस समस्या या वृत्तपत्राच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन नुकतेच मुंबईत संविधान निवासस्थान येथे करण्यात आले.             यावेळी साप्ताहिक पोलीस समस्या चे संपादक पंकजदादा साळुंखे;  रिपब्लिकन पक्षाच्या व्यापारी आघाडी चे महाराष्ट्र अध्यक्ष पोपटशेठ घनवट ; नाशिक आवृत्ती चे संपादक संदीप ढोले; मुंबई आवृत्ती संपादक निलेश जाधव; डॉ प्रकाश पाटील; नरेंद्र पवार; वंदना पाटील आणि सहकारी उपस्थित होते.               साप्ताहिक पोलीस समस्या चे संपादक पंकजदादा साळुंखे हे संविधानिक मूल्यांची जोपासणारे करणारे  पत्रकार  आहेत. त्यांनी सामाजिक क्षेत्रात चांगले योगदान दिले आहे. त्यानुसार पत्रकारितेतून न्याया साठी पंकजदादा साळुंखे संघर्ष करीत राहतील अशा शब्दांत रिपाइं व्यापारी आघाडी चे महाराष्ट्र अध्यक्ष पोपटशेठ घनवट यांनी साप्ताहिक पोलीस समस्या ला शुभेच्छा दिल्या.                यावेळी  संपादक पंकजदादा साळुंखे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. ना.रामदास आठवले यांनी दाखविलेला विश्वास आपण सार्थ करीत संविधानानुसार सामाजिक न्यायासाठी निष्पक्ष पत्रकारिता करणार असल्याचे प्रतिपादन पंकजदादा साळुंखे यांनी व्यक्त केले. 

Post a Comment

0 Comments