डोंबिवलीत झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे काम बंद आंदोलन सुरू

डोंबिवली  ( शंकर जाधव )  घरपोच गरमागरम खाद्यपदार्थ आणि जेवण पोचविणाऱ्या अनेक ऑनलाईन कंपन्या लॉकडाऊन काळात देखील सुरु असल्यामुळे नोकरी सुटल्याने बेरोजगार झालेल्या तरुणांनी या कंपन्यामध्ये डिलिव्हरी बॉयची नोकरी पत्करली.


          
             मात्र त्यानंतर अचानक झालेल्या पेट्रोल वाढीमुळे मिळणारे कमिशन तुटपुंजे झाले त्यामुळे ते परवडत नसल्याने कामबंद आंदोलन केले आहे.काल डोंबिवलीत सुरु झालेले आंदोलनाचे लोन आज कल्याणात आणि मुंबईत देखील पोचले आहे. जोपर्यत कंपनी कडून कमिशन वाढवून दिले जात नाही तोपर्यत हे आंदोलन सुरु राहणार असल्याचे या कामगारांनी सांगितले.          १० किमीची ऑर्डर पोचविण्यासाठी ६६ रुपयाचा मोबदला मिळतो मात्र यात पेट्रोल वगळता दिवसाला जेमतेम २०० ते ३०० रूपये सुटतात इतक्या तुटपुंज्या रकमेत घरखर्च चालवायचा कसा असा सवाल करत या डिलिव्हरी बॉय कडून हा मोबदला वाढवून देण्याची मागणी कंपनीकडे करण्यात आली होती मात्र या कर्मचार्याना घेताना त्यांच्याबरोबर पार्टनर म्हणून करार केला जात असल्यामुळे हे कर्मचारी संघटना तयार करू शकत नसल्यामुळे त्यांना आंदोलन देखील करता येत नसल्याने त्यांच्या मागण्या ठामपणे मांडता येत नाहीत. यामुळेच आता या कामगारांनी संपाचे हत्यार उपसले आहे.           काल पासून हे सर्व कर्मचारी ऑफलाइन गेले असून कंपनीने काल डोंबिवलीतील ऑर्डर साठी कल्याण मधील डिलिव्हरी बॉयचा वापर केला मात्र आज दुपार पासून कल्याण मधील कर्मचारी देखील संपात सहभागी झाले असून मुंबईतील कर्मचार्यांनी देखील या मागणीसाठी संपत सहभागी होण्याची तयारी दाखविली आहे. तीन दिवसाच्या या संपामुळे ऑनलाईन ऑर्डर देत खाद्य पदार्थ मागविणार्या नागरिकाचे हाल होणार आहेत.
             दरम्यान नागरिकांना वेठीस धरण्याचा आपला कोणताही प्रयत्न नसून प्रवास खर्च परवडत नसल्याने तो वाढवून मिळावा या आपल्या हक्कासाठी आपण हे आंदोलन केले असून हॉटेल व्यवसायिकांनी केलेल्या आंदोलनाला आपण पाठींबा देणार असल्याचे या डिलिव्हरी बॉय कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments