टिटवाळ्यात देखील नारायण राणेंच्या वक्तव्याचा शिवसैनिकांनी केला निषेध
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उधदव ठाकरे यांच्या बद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत.  कल्याण तालुका ग्रामीण शिवसेनायुवासेना व मांडा टिटवाळा शिवसेना यांच्या तफै टिटवाळा येथे चौकात नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. शिवसैनिकांनी राणे यांचे पोस्टर पायाने तुडवत चपला मारल्या. त्यानंतर टिटवाळा पोलिस स्टेशनला भेट देत पोलिस निरीक्षक राजू वंजारी यांना निवेदन दिले व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली.यावेळी शिवसेना तालुका ग्रामीण प्रमुख वसंत लोणेयुवासेना ठाणे जिल्हा सचिव अल्पेश भोईरउप जिल्हा प्रमुख सदाशिव सासेमांडा टिटवाळा विभाग प्रमुख श्रीधर खिसमतरावशाखा प्रमुख ज्ञानेश्वर मढवीदिलीप पातकररमेश बांगरसंचालक भूषण त्रजाधव,  नामदेव बुटेरेबंदू जाधव, अनिल बांगरसंदिप तरे, कैलास मगर, शाखा प्रमुख भास्कर टेंभे, विजय देशेकरप्रदिप राठोडसमीर शेलारशाखा प्रमुख भास्कर टेंभेनितीन विशेबंधू जाधवविलास मोरेकैलास मगरनरेश सुरोशीआदी उपस्थित होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो. त्यांनी कल्याण ग्रामीण भागात येवून दाखवावे त्यांची कोंबड्या सारखी अवस्था करू असा इशारा यावेळी तालुका प्रमुख वसंत लोणे यांनी दिला.

Post a Comment

0 Comments