ऑनलाईन इकोफ्रेंडली गणेशा मेकिंग वर्कशॉपमध्ये ११९४ विद्यार्थ्यांनी साकारला आपला बाप्पा


■पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्याचा दिला मूलमंत्र...


कल्याण, कुणाल  म्हात्रे  : ऑनलाईन इकोफ्रेंडली गणेशा मेकिंग वर्कशॉपमध्ये ११९४ विद्यार्थ्यांनी आपला बाप्पा साकारत पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्याचा मूलमंत्र दिला आहे. आविष्कार एज्युकेअर फाउंडेशनएनजीओ गेल्या दहा वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी इकोफ्रेंडली गणेशा मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करत आले आहे. प्रेत्येक वर्षी असंख्य विदयार्थी या वर्कशॉपच्या माध्यमातून प्रत्यक्षरीत्या आपल्या कलेला नवीन आयाम देत असतात. नावीन्य पूर्ण कौशल्य आत्मसात करत असतात.        यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात वर्कशॉप घेणे शक्य नसल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने जागतिक इकोफ्रेंडली गणेशा मेकिंग वर्कशॉप आविष्कारच्या माध्यमातून घेण्यात आला. यातून ११९४ विद्यार्थ्यांनी आपल्या घरी बसून इकोफ्रेंडली गणेशा (आपला बाप्पा) बनवण्याचा आनंद घेतला.  कोरोनाच्या नकारात्मक वातावरणात सकारत्मक ऊर्जा आणि कार्यनाविन्यपूर्ण कला शिकण्याची ही सुवर्णसंधी विद्यार्थ्यांना आविष्काने दिली.  यातूनच आपण सर्व एकत्र येऊन पर्यावरण संवर्धन करू शकणार आहोत. पर्यावरण संवर्धनाच्या आमच्या प्रयत्नांना जन्सामण्यांमधून खूप उत्तम प्रतिसादसाथ मिळत आहे.  सर्व सहभागी विद्यार्थ्यांना  सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.या तीन दिवसीय वर्कशॉप मध्ये पहिल्या दिवशी मनीष व्यापारी या गणेशमूर्ती कलाकार तसेच कलाशिक्षक यांनी हाताने गणपती बाप्पा कसा बनवायचा हे शिकवले. दुसऱ्या दिवशी गणेश गव्हाणकर यांच्या गणेशमूर्ती वर्कशॉमध्ये शाडूच्या मातीपासून साच्याच्या माध्यमातून गणपती कसा बनवायचा त्याचे फिनिशिगअलंकारसजावट कशी करायची हे शिकविण्यात आले. तर तिसऱ्या दिवशी आपण बनवलेल्या बाप्पाचे रंगकामसजावटडोळ्याची आखणी व घरच्या घरी इकोफ्रेंडली पद्धतीने बाप्पाचे विसर्जन कसे करावे हे सांगण्यात आले. यासाठी गणेशमूर्ती कलाकार गणेश गव्हाणकर यांनी मोलाचे सहकार्य केले.       शाडूची भिजवलेली माती किंवा लाल भिजवलेली मातीचमचापेन रिफिल व इतरबाप्पासाठी पाठसुती कापडप्लॅट ब्रशपाण्यासाठी वाटी किंवा मग अशा साहित्याचा उपयोग करण्यात आला.  या वर्कशॉमध्ये धुळेजळगावमलकापूरपुणेकोल्हापूरनागपूरआनंदवनसांगलीसाताराऔरंगाबादवाशीपनवेलमुंबई अश्या विभागातून अवघ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी साहबाग नोंदवला.       या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी तहसीलदार रतीलाल चव्हाणउत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटीलआविष्कार फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन जाधवखजिनदार गिरीश मंजुळेदलजीत बोन्सस्पूर्ती फाऊंडेशनचे बजरंग तांगडकरप्रणय काटेअदिती कदमहे उपस्थित होते. आविष्कार चे संस्थापक सचिव विनोद शेलकर यांनी सूत्रसंचालन केले. रोहित माळी आणि तन्मय चव्हाण यांनी हा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी मोलाची कामगिरी केली.

Post a Comment

0 Comments