गोरेगाव कातकरी पाडा येथे आदिवासी दिन साजरा

 कल्याण, कुणाल  म्हात्रे  :   गस्ट जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम अंबरनाथ तालुका गोरेगाव कातकरीपाडा या ठिकाणी साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी क्रांतीवीर हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व आदिवासी बांधवानी दर्शन घेऊन स्वांताञ्याच्या ७४वर्षानंतर पण आदिवासी बाःधवांच्या झोपड्डी पर्यंत स्वांताञ्याची खरी किरणे पडलेली नाही.             २०२२मध्ये स्वांतञ्य देशाला ७५वर्ष पुर्ण होऊन देश अमृत मोहत्सव वर्षामध्ये पदार्पन करेल किमान ७५ वर्षानंतर संविधान निर्माते डा.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये दिलेले आम्हांला  मुलभुत आधिकार मिळालेच पाहीजे यासाठी आम्ही लढणार अशी शपथ घेऊन कार्यक्रमांची सुरूवात करण्यात आली.

      

 

                         या कार्यक्रमांमध्ये पांरपांरीक वेशभूषा करत आदिवासी महीलांनी नृत्य करून आपल्या हक्काचा दिवस यावेळी साजरा केला. तर आदिवासी लहान मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे नृत्य करून उपस्थीत लोकांची मने जिंकुन घेतली. सर्वांनी सामुहीक पणे आदिवासी दिनांचे औचित्य साधुन पांरपांरीक गौरीडब्बा, तुरतारपा नृत्य केले. यावेळी श्रमजीवी संघटनेचे जि.सरचिटणीस राजेश चन्ने यांच्यासह ता.ध्यक्ष बाळु हेलम कल्याण ता.ध्यक्ष विष्णु वाघे, सचिव आरुण पवार, उपाध्यक्ष गोटीराम वाघे, बाब्या पारधी, शंकर वारघडा, प्रकाश मुकणे, लता वाघे, अंकुश वाघ, मारुती वाघे यांनी नृत्यामध्ये सहभाग घेऊन उपस्थीतांचे आंनद द्विगुणीत केला.

Post a Comment

0 Comments