Header AD

दिव्यांग बंधन एक अविस्मणीय अनुभव

 ठाणे,  प्रतिनिधी  :  दिव्यांग कला केंद्रातील आपल्या विद्यार्थ्यांकडून  राख्या तयार करुन नारळीपौर्णिमा रक्षाबंधनाचा हा सण दिव्यांग बंधन या नावाने गेली अनेक वर्षे साजरा करण्याचा संधी मला आमच्या दिव्यांग कला केंद्रातील सर्व टीमला मिळत असते. त्याचप्रमाणे काल सायंकाळी तब्बल दीड वर्षानंतर काही दिव्यांग मुलं दिव्यांग कला केंद्रात आली. संध्या नाकती, रश्मी असाई, परेश दळवी ,गौरी यांनी या मुलांकडून राख्या तयार करून घेतल्या.त्यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा होता.          या प्रसंगी ठाण्याच्या उपमहापौर मा.पल्लवीताई कदम व ठाणे परिवहन सभापती मा.विलास जोशी उपस्थित होते.मग सुरू झाला दिव्यांग बंधनाचा एक अगदी भावनिक ऋणानुबंधनाचा  कायम मनाच्या कोपऱ्यात जतन करुन ठेवावा असा रक्षाबंधनाचा काही क्षणांचा सुखकर प्रवास.जोशी सरांना  दिव्यांग मुलींनी राखी बांधली व पल्लवी ताईंनी दिव्यांग मुलांना राखी बांधत सुरुवात केली.त्यानंतर उपस्थित वुई आर फॉर यू च्या समस्त स्वयंसेवकांनी आपल्या दिव्यांग बहिणींकडून राख्या बांधून घेत सर्वचजण भावूक झाले.              त्यानंतर दिव्यांग कला केंद्रातर्फे सर्वच विद्यार्थ्यांना भेटवस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच तालावर ठेका धरत पार्थ खडकबान, विजय जोशी, अन्मय मेत्री, अविनाश मुंगसे, गौरव जोशी, गौरव राणे, अपूर्वा दुर्गुले, रुपाली विभुते, रेश्मा जेठरा, आरती गोडबोले, जान्हवी कदम या सर्वच  दिव्यांग विद्यार्थी कलाकारांनी तीन वेगवेगळ्या नृत्यांवर धम्माल उडवत सर्वांना खुश केले. दिड वर्षानंतर केंद्रात मुलं पुन्हा आली आणि काही काळ हरवलेलं त्यांच्या चेहऱ्यावरील हसू पुन्हा एकदा बघुन मोठं समाधान मिळालं असं मत किरण नाकती यांनी व्यक्त केले.

दिव्यांग बंधन एक अविस्मणीय अनुभव दिव्यांग बंधन एक अविस्मणीय अनुभव Reviewed by News1 Marathi on August 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads