वाल्मिकी समाजाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष ...जातीचे दाखले देण्याची भाजप मागणी..
डोंबिवली ( शंकर जाधव ) वाल्मिकी समाजाला जातीचे दाखले मिळण्यास  खूपच अडचणी येतात.त्यामुळे नाराज झालेल्या या समाज बांधवांनी  भाजपकडे धाव घेतली. त्यांचे म्हणणे ऐकूण भाजप तुमच्या सोबत सदैव असून या समाजाला जातीचे दाखले मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू असे आश्वासन भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी दिले.
            भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण  यांच्या मार्गदर्शन कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत  कांबळे यांनी कल्याण तहसीलदार दिपक  आकडे  तहसीलदार आणि एकझिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट  भेट घेऊन त्यांना वाल्मिकी समाजाला जातीचे दाखले लवकरात लवकर द्यावे अशी विंनती केली.
             भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा अध्यक्ष  कांबळे  यांनी तहसीलदार  यांना निवेदन दिले.वाल्मिकी समाजातील फक्त १० टक्के लोकांकडे जातीचे दाखले  आहे. तसेच दाखले इतरांनाही मिळावे जेणे करून वाल्मिकी समाजातील शिक्षणापासून वंचित राहिलेले मुला मुली यांना लाभ मिळावा यासाठी त्यांना जातीचे दाखले अत्यंत गरजेचे आहे. 
         पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या कामातून त्यांनी बाहेर पडावे आणि समाजात चांगले शिक्षण घेऊन समाजात मोठ्या नाव करावे. वाल्मिकी समाजातील मुलांना डॉक्टर,इंजिनियर तसेच चांगले समाजसेवक घडून आणण्यासाठी शिक्षण हे खूप महत्त्वाचे आहे. त्याकरिता जातीचा दाखला लवकरात लवकर मिळावे यासाठी तहसीलदारांना  विनंती केली.
          वाल्मिकी समाजातील युवा बांधवांना भाजप कल्याण जिल्हाअध्यक्ष शशिकांत  कांबळे  यांनी विनंती केली की, आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना समाजात मोठे नाव कमवण्यासाठी त्यांच्यातील एक चांगलं ,समाजसेवक चांगला खेळाडू घडवून आणावे यासाठी त्यांना शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांना जातीचे दाखले मिळवून देऊ त्यासाठी भाजपत्यांच्यासोबत आहे.
           यावेळी भाजप कल्याण जिल्हा सदस्य राजेंद्र बेंवल,  डोंबिवली पूर्व सचिव राजू शेख, वॉर्ड क्र ७३  अध्यक्ष कपिल  शर्मा,  युवा मोर्चा डोंबिवली पूर्व उपाध्यक्ष रुपेश पवार, युवा मोर्चा डोंबिवली पूर्व कार्यकारणी सदस्य आकाश  बागडी, वॉर्ड क्र.७३ अध्यक्ष अमोल तायडे, युवा मोर्चा वॉर्ड क्र.७३ अध्यक्ष  रवी बैध तसेच युवा कार्यकर्ते व वाल्मिकी समाजातील बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments