कळवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई
ठाणे , प्रतिनिधी   :  ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज कळवा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.          या कारवाईतंर्गत कळवा प्रभाग समितीमधील जॅम फॅक्टरी लगत तळ अधिक ६ मजली अनधिकृत इमारतीचा स्लॅब व ०४ कॉलम तोडण्यात आले. तसेच शिवशक्ती चाळ, इंदिरानगर येथे डोंगरावरील वन विभागाच्या जागेवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या कच्चापकक्या बैठ्या ४५ झोपड्यांवर वन विभाग व ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत सयुंक्तपणे  निष्कासनाची कारवाई करण्यात आली.        सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त फारुख शेख, प्रणाली घोंगे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने करण्यात आली.                        

Post a Comment

0 Comments