डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि व्यक्तमित्व संकल्पना या पुस्तकाचे उद्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार प्रकाशनमुंबई दि. 6  -  डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि व्यक्तिमत्व संकल्पना या चंद्रमणी जाधव यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन उद्या शनिवार दि. 7 ऑगस्ट रोजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.          उद्या शनिवारी दुपारी 4 वाजता भीमछाया सांस्कृतीक केंद्र कालिना सांताक्रूझ पूर्व येथे  या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती या पुस्तकाचे लेखक चंद्रमणी जाधव यांनी दिली आहे.           डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि व्यक्तिमत्व विकास या पुस्तकाला रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस;ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अविनाश महातेकर यांनी प्रस्तावना लिहीली आहे.             पुस्तकाचे प्रकाशक राजरत्न ठोसर यांनी केले असून यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमीलन शुक्ला; गौतम सोनवणे; प्रकाश जाधव;प्रकाश मोरे उपस्थित राहणार असून सूत्रसंचालन हेमंत रणपिसे करणार आहेत.या कार्यक्रमाचे संयोजन धम्मदान ट्रस्ट प्रवीण मोरे आणि सतीश निकाळजे यांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments