भाजयुमो कल्याण जिल्ह्यातून २००० पत्र वर्षा निवासस्थानी

  

 डोंबिवली ( शंकर जाधव ) भाजयुमो महाराष्ट्र परदेशातून ७५००० पत्र राज्याचे उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी पाठविण्यात येणार आहे. डोंबिवली एमआयडीसी पोस्ट ऑफिस येथे प्रातिनिधिक स्वरूपात पत्र पाठवण्यात आले. आमचा देश हा आमच्या अस्मितेचा विषय आहे आणि देशाच्या स्वातंत्र्याचे कितवे वर्ष हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती नसणे हे राज्याचे दुर्दैव आहे.

         देशाचा अभिमान असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला हिरक महोत्सव म्हणून संबोधणे मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला शोभत नाही अशा आशयाचे पत्र राज्यभरातून पाठवले जाणार असल्याचे भाजयुमो कल्याण जिल्हाध्यक्ष मिहिर देसाई यांनी सांगितले.

       यावेळी भाजयुमो कल्याण जिल्हाध्यक्ष मिहिर देसाईजिल्हा उपाध्यक्ष अथर्व ताडफळेजिल्हा सचिव चिंतन देढियाग्रामीण मंडल सरचिटणीस चैतन्य काळणरतन पुजारीगांधार कुलकर्णी,  संदीप शर्माअपूर्व कदम हे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments