जवाहर बाग स्मशान भूमीत डॉ. राजेश मढवी फाऊंडेशनच्या माध्यमातून कुलर पाण पोईचे अनावरण
ठाणे, प्रतिनिधी  :  गेले ६ महिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील १०० च्यावर कर्मचारी तसेच स्मशानात अंतिम विधीसाठी येणाऱ्या नातेवाईक मंडळींना जवाहर बाग स्मशान भूमीत पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध नव्हते. यासाठी येथील कर्मचाऱ्यांनी डॉ. मढवींकडे  याबाबत निवेदन दिले. 
          याची गांभीर्याने दखल घेत मढवी फाऊंडेशन  च्या माध्यमातून त्वरित या ठिकाणी पाणी शुद्ध करण्यासाठी कुलर, फिल्टर, टाकी अशी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली. त्याचे अनावरण सन्माननीय अँडव्होकेट गजाननराव चव्हाण, अध्यक्ष महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल  यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 
         सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे *म्हणून आमदार संजयजी  केळकर, अध्यक्ष आमदार निरंजनजी डावखरे, प्रदेश सचिव संदीपजी लेले, नगरसेवक संजयजी वाघुले, नगरसेविका सुनेश जोशी व अन्य मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे फाउंडेशनच्या वतीने  अध्यक्ष डॉ. राजेश मढवी व नगरसेविका सौ. प्रतिभा मढवी यांनी शतशः आभार मानले.

Post a Comment

0 Comments