Header AD

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" उपक्रमाचा महापौर व आयुक्ताच्या शुभहस्ते शुभारंभ


ठाणे महापालिकेच्यावतीने "स्वांतत्र्य दिन" मोठ्या उत्साहात साजरा


ठाणे, प्रतिनिधी   : 15 ऑगस्ट भारताचा 74 वा स्वांतत्र्य दिनाचा वर्धापन दिन  ठाणे महानगरपलिकेच्या वतीने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला, या निमित्ताने राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहन महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अग्निशमन दलाच्या बॅन्ड पथकाने राष्ट्रगीतावर बॅन्ड सादर केला व ठाणे महानगरपालिकेच्या सुरक्षा दल, अग्निशामक दलाचे जवान यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. तत्पुर्वी महापालिका महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना अग्निशमन दल व सुरक्षा दलाच्या जवानांनी मानवंदना दिली.


         यावेळी उप महापौर सौ. पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय देवराम भोईर, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा नम्रता फाटक, परिवहन समिती सभापती विलास जोशी, नगरसेवक नारायण पवार, विकास रेपाळे, अतिरिक्त आयुक्त (2) संजय हेरवाडे,उपायुक्त अशोक बुरपल्ले, मारुती खोडके, मनीष जोशी यांच्यासह सर्व प्रभागसमितीच्या सहाय्यक आयुक्त, इतर अधिकारी,कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.           ध्वजारोहणानंतर महापालिका भवन येथील कै.नरेंद्र बल्लाळ सभागृहात पुजनीय नेत्यांच्या प्रतिमांना, तसेच शहरातील आदरणीय व्यक्तींच्या पुतळयांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.           तद्नंतर स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ठाणे महापालिकेच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करण्याच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमातंर्गत आकर्षक रांगोळी तसेच फुलांची सजावट व ध्वनीफितीचे सादरीकरण करुन स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचा शुभारंभ  महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला.          तसेच महाराष्ट्र शासन, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे माझी वसुंधरा अभियान 2020 अंतर्गत हरित शपथ घेण्यात आली. यावेळी ठाणेकरांच्यावतीने पर्यावरणाच्या रक्षणासाठी जनजागृती करुन त्यासाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याच्या शपथेचे वाचन महापौर नरेश म्हस्के यांनी केले व सर्वांनीच पर्यावरणाच्या संवर्धनासाठी तत्पर राहणार असल्याची शपथ यावेळी सर्वांनी घेतली.


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" उपक्रमाचा महापौर व आयुक्ताच्या शुभहस्ते शुभारंभ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" उपक्रमाचा महापौर व आयुक्ताच्या शुभहस्ते शुभारंभ Reviewed by News1 Marathi on August 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads