मनसे कामगार सेनेच्या वतीने चिपळूण पूरग्रस्तांना भरगोस मदत
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कोकणात आलेल्या महापुरामुळे अनेक ठिकाणी नागरिकांचे नुकसान झाले असून नागरिकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.  अशा नागरिकांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना पुढे सरसावली असून चिपळूणच्या पूरग्रस्तांना मनसे कामगार सेनेच्या वतीने भरगोस मदत करण्यात आली आहे.  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशानंतर मोठ्या संख्येने मनसैनिक पूरग्रस्तांना मदत करत आहेत. अशाचप्रकारे मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी देखील आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत चिपळूण गाठत ५ दिवस अहोरात्र मेहनत घेत येथील पूरग्रस्तांना सर्वोतोपरी मदत केली.  येथील लोकांसाठी पाण्याची सोय आधी केली. लोकांसोबत श्रमदान करून गाव स्वच्छता मोहिमत्यांच्यासाठी जेवणगॅस शेगड्याकपडे, पुरानंतर पसरणारी रोगराई दूर व्हावी म्हणून निर्जंतुकीकरण मोहीम  राबवली. लोकांच्या आरोग्याची काळजी म्हणून  डॉक्टरांची टीम गावा गावात रुजू केलीलोकांच्या औषध पाण्याची सोय केली. या मदत कार्यात मनविसे शहर अध्यक्ष निर्मल निगडे, कामगार सेना उपाध्यक्ष नंदकिशोर तळवाडेकर, मातोश्री ट्रस्टचे विश्वस्त संदीप परब आदींसह इतर अनेक कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले. या संपूर्ण दौर्यात खुप काही शिकायला मिळाल. लोकांचे होत्याचे नव्हते झालेले संसार उभे करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले मदतीचे हात पाहून सुखावलो.  आपल्या एका हाताला दुखापत झाली असताना देखील मनोज चव्हाण यांनी  संपूर्ण चिपळूण पिंजून काढला. एक व्यक्ती एवढ्या सगळ्या अंगाने विचार करून लोकांना सढल हाताने मदत करतोयआपल्या परिवाराप्रमाणे त्यांना जपतोय. 

          कामगारांवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी हा माणूस जसा आक्रमक असतो तसाच मोठ्या मनाने पूरग्रस्तांना देखील मनोज चव्हाण यांनी मदत केली असून त्यांचे कार्य आम्हा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांसाठी प्रेरणा देणारे असल्याची प्रतिक्रिया मनविसे शहर अध्यक्ष निर्मल निगडे यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments